Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

यशस्वी जीवनासाठी संत विचार व संत संगत फार महत्त्वाची आहे

 


परळी / प्रतिनिधी 

परमपूज्य सद्गुरु माऊली  महाराज चाकरवाडीकर दादा यांच्या पुण्यतिथी  दैनिक मराठवाडा साथी तसेच अ. भा. वारकरी मंडळ यांच्या वतीने श्री क्षेत्र परळी वैजनाथ येथे सुरू असलेला किर्तन महोत्सव या नाम सप्ताहात 

भागवताचार्य हभप श्री जगदीश महाराज सोनवणे यांनी आपल्या मधुर वाणीतून अतिशय सुश्राव्य कीर्तन सेवा संपन्न केली. सोनवणे महाराजांनी कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग 

|| संतांचे संगती मनोमार्ग गती |

अकळावा श्रीपती येणे पंथे  ||  

रामकृष्ण वाचा भाव हा जिवाचा

आत्मा जो शिवाचा राम जप

एकतत्व नाम साधिती साधन 

द्वैताचे बंधन न बाधीजे

नामामृत गोडी वैष्णवा लाधली

 योगिया साधली जिवणकळा

सत्वर उच्चार प्रलादिबिंबला

 उद्धवा लाधला कृष्ण दाता

ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ

 सर्वत्र दुर्लभ विरळ जाणे

हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी  || 

  माऊली ज्ञानोबारायांच्या हरिपाठ ग्रंथातील  हा अभंग कीर्तन सेवे करीता घेतला असून या अभंगाद्वारे सोनवणे महाराजांनी अतिशय महत्त्वपूर्ण संदेश दिला.

माणूस हा संगतीनेच घडल्या जातो व संगतीनेच बिघडल्या जातो 

जीवनात संगतीला फार महत्त्व आहे संगतच मनुष्याला पतन आणि उद्धाराला कारण ठरते म्हणून तर म्हटले आहे पतन उद्धार संघाचा महिमा माणूस हा संगतीनेच घडल्या जातो व संगतीनेच बिघडल्या जातो संगतीचाच परिणाम मनुष्याला यश व अपयशापर्यंत पोहोचवत असतो तसेच जीवनात देव मिळावा देवकाळावा देवळावा देव आकडावा वाटत असेल तर देखील संतांचीच संगत आवश्यक आहे हेच सोनवणे महाराजानी आज कीर्तनामध्ये घेतलेल्या अभंगाद्वारे प्रतिपादित केले.

भक्त प्रल्हाद, ध्रुव बाळ यांच्या जीवनात संत नाराजींची संगत घडली परिणाम बाल वयामध्ये देव मिळाला देव कळाला देव वळाला व देव आकळला आणि जीवनाचे कल्याण होते ही संत पदाला पोहोचले . तसेच छत्रपती शिवरायांच्या जीवनामध्येही संत तुकोबारायांची संगत घडली होती आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये संतांची संगत घडावी म्हणजे जीवनाचे भलं झाल्याशिवाय राहणार नाही जीवनाचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही

सोनवणे महाराजांनी अतिशय सुंदर आवाजात वेगवेगळे उदाहरण देत श्रोत्यांना  मंत्रमुग्ध केले,

तसेच महाराजांनी भोलेनाथाचे वर्णन करत महादेवाची भक्ती व महादेवाला काय आवडतं याचे विश्लेषण करत कीर्तनामध्ये घेतलेल्या अभंगातून आत्मा जो शिवाचा रामजप 

महादेवाचा आत्म असणारे राम प्रभू यांच्या नावाचे महत्त्व पटवून दिले तसेच भगवंताच्या नावानं आपल्या जीवनातील सर्व पाप नाहीसे होतात आणि जीवनाचे सार्थक होत याचे वेगवेगळ्या उदाहरणाने सांगितले. कार्यक्रमाला उपस्थित, मा‌. सतीश शेठ बियाणी चंदू लालजी बियाणी शेठ , ह भ प विश्वंभर महाराज उखळीकर, पत्रकार बंधू व इतर मान्यवर तसेच  पंचक्रोशीतील भजनी मंडळ मांडवा भजनी मंडळ संगम भजनी मंडळ श्री रत्नेश्वर वारकरी शिक्षण संस्थेतील बाल भजनी मंडळ कन्हैया अध्यात्मिक गुरुकुल मधील बाल भजनी मंडळ मृदंग अशोक महाराज कराळे आधी करून सर्वांच्या उपस्थितीमध्ये व कार्यक्रम संपन्न झाला व हभप श्री.रामेश्वर महाराज कोकाटे अखिल भारतीय वारकरी मंडळ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांनी कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या