Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

BEED | पोलीस अधीक्षक ठाकूर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कविता मॅडम यांचे कार्याचे कौतुक

थेट सुसंवाद |आषाढी एकादशी व बकरी ईद निमित्त पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण 


आपला ई पेपरबीड

आषाढी एकादशी व बकरी ईद निमित्त औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ ज्ञानेश्वर चव्हाण यांच्यासोबत ज्येष्ठ नागरिक,पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी आदींची थेट सुसंवाद बैठक दि 23 रोजी बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कविता नेरकर मॅडम, सर्व विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते. 

परळी शहरांमध्ये संवेदनशील गंभीर घटना घडल्या होत्या. परंतु अतिरिक्त पोलीस अधीक्षक कविता नेहरकर मॅडम यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी  प्रयत्न केले. जनतेत असंतोष पसरला असताना पोलीस निरीक्षक सलीम चाऊस आणि पोलीस उपनिरीक्षक चांद मेंडके यांना सोबत घेऊन कायद्याच्या चौकटीत राहून सर्व काही करू असं समजून सांगण्यात त्यांना यश आले.

परळी येथील संभाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मागील पन्नास वर्षांपासून सुरू असलेला कुंटण खाना बंद केला तसेच शहरामध्ये पेट्रोलिंग मुळे नागरिक समाधानी आहेत. परळीकरांच्या वतीने भगवान साकसमुद्रे, सय्यद अफसर, युनुस शेख आणि शकील कच्चे यांनी त्यांना भेट देऊन स्वागत केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या