Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत राजस्थीनज पोदार लर्न स्कूल येथे बनत आहे भव्य क्रीडा मैदान ....

 




परळीत पोदार लर्न स्कूल येथे  बनत आहे भव्य क्रीडा मैदान ....


परळी / प्रतिनिधी 

परळी परिसरातील राजस्थानीज् पोदार लर्न स्कूल येथे  खो-खो,कबड्डी, हॉलीबॉल, फुटबॉल, क्रिकेट, याखेळाची शाळेतील विद्यार्थ्यांची आवड व खेळाडूंच्या खास आग्रहामुळे बनत आहे भव्य क्रीडांगण...


परळी तालुक्याच्या मातीने अनेक क्षेत्रात जिल्ह्याचा,तालुक्याचा गौरव वाढवला आहे. क्रीडा क्षेत्रातही क्रीडाप्रेमी विद्यार्थ्यांनी, युवकांनी आपल्या कौशल्यपूर्ण खेळाने कौतुकास्पद कामगिरी करावी. क्रीडा क्षेत्रातील प्रश्न सोडवण्याच्या हेतूने विद्यार्थ्यांची खेळाची आवड आणि आग्रह लक्षात घेऊन शहरातील पोदार लर्न स्कूल येथे भव्य क्रीडांगण तयार होत आहे. 


विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनात शालेय परिसरात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण कलागुणांना वाव मिळावा व खेळाडूंना दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच ज्ञानाबरोबरच व्यायामाची तसेच उत्तम आरोग्याच्या दृष्टिकोनातून खेळाडूंना विविध खेळांचे दर्जेदार प्रशिक्षण मिळावे..म्हणून परळी शहरातील पोदार लर्न स्कूल येथे खेळाडूंसाठी  भव्य क्रीडांगण तयार होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या