Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत पारंपरिक पद्धतीने गुलालाची उधळण करत साजरा होणार श्री.शनैश्वर जन्मोत्सव

 


शनी भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन..

परळी /प्रतिनिधी

येथील वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या पुरातन श्री.शनैश्वर मंदिरात आज शुक्रवारी (दि.१९) सायंकाळी ७ वाजून ७ मिनिटांनी पारंपरिक पद्धतीने गुलालाची उधळण करत साजरा होणार आहे. शनैश्वर जन्मोत्सवा नंतर सायंकाळी ७.३० ते १० महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यास भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन श्री.शनी मंदिर देवस्थान ट्रस्ट कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.    

येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री.वैद्यनाथाच्या पायथ्याशी असलेल्या श्री.शनी मंदिरात शुक्रवारी सायंकाळी ७.७ मिनिटांनी श्री.शनैश्वर जन्मोत्सव पारंपरिक पद्धतीने गुलालाची उधळण करत साजरा होणार आहे. 


जन्मोत्सवानंतर सायंकाळी ७.३० ते १० यावेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या सात दिवसापासून श्री.शनी मंदिरात श्री.शनैश्वर जन्मोत्सवा निमित्त अखंड शिवनाम सप्ताह व परमरस्य ग्रंथ पारायण सुरू आहे. या पारायणाची समाप्ती शनिवारी (ता.२०) प्रसादाच्या किर्तनाने होणार आहे. या सप्ताहात विविध धार्मिक, सामाजिक, रक्तदान शिबीर, आरोग्य विषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी श्री शनैश्वर जयंती आहे. या जयंती निमित्त जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या जन्मोत्सवास व महाप्रसादास पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री.शनी मंदिर देवस्थान ट्रस्ट कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या