Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

■ ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वै. आयोजित शानदार सोहळ्यात ४१ बटुंवर सामुदायिक उपनयन संस्कार !

 






परळीसह मराठवाड्यातील विविध ठिकाणांहून समाजबांधव व विविध क्षेत्रातील सर्वस्तरीय मान्यवरांची उपस्थिती_

परळी वै./ प्रतिनिधी

     ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वैजनाथ आयोजित शानदार सोहळ्यात ४१ बटुंवर सामुदायिक उपनयन संस्कार करण्यात आले. परळीसह मराठवाड्यातील विविध ठिकाणांहून समाजबांधव व विविध क्षेत्रातील सर्वस्तरीय मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्याला लाभली.

          ब्राह्मण समाजाची मध्यवर्ती संस्था असलेल्या ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वै.च्या वतीने आयोजित ४३वा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा आज २४ मे रोजी शानदार व वैभवी स्वरूपात संपन्न झाला. शानदार सोहळ्यात ४१ बटुंवर सामुदायिक उपनयन संस्कार करण्यात आले. संत -महंत, मान्यवर व समाज बांधवांची सोहळ्यासाठी मोठी उपस्थिती  लाभली. गेल्या ४३ वर्षा पासून ब्राह्मण बहुद्देशीय सभा परळी वै.च्या वतीने अविरतपणे हा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा उपक्रम चालवला जातो.शानदार आयोजन, नियोजनबध्द सोहळा या वैशिष्ट्यामुळे हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे. यावर्षीचा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा सकाळी १०:१३ वा. हालगे गार्डन परळी वै. येथे ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चार व विधीपुर्वक संपन्न झाला. या सोहळ्याचे पौरोहित्य मनोहर देव जोशी व ब्रह्मवृंदांनी केले. या सोहळ्यात महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या ४१बटूंवर उपनयन संस्कार करण्यात आले. 


      दोन दिवस हा सोहळा अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. आज सकाळी मातृका पुजनानंतर सर्व बटूंची हालगे गार्डन ते प्रभू वैद्यनाथ मंदिर अशी शोभायात्रा काढण्यात आली होती. वाद्यवृंद, मंत्रोच्चार व समाज बांधवांची मोठी  उपस्थिती यामुळे परिसर दणाणून गेला होता. सनातन वैदिक हिंदुधर्मातील सोळा संस्कारांपैकी प्रमुख अतिशय महत्त्वपूर्ण असा संस्कार म्हणजे उपनयनसंस्कार असतो. या सोहळ्यात ४१ बटुंवर वेदोक्त परंपरेप्रमाणे सामुदायिक उपनयन संस्कार करण्यात आले.

       ब्राह्मण बहुद्देशीय सभा,परळी वैजनाथ द्वारा ४३ वा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा अतिशय नेत्रदीपकरित्या संपन्न झाला.तब्बल ४१ बटुंवर व्रतबंध संस्कार सोहळा मंगलमय वातावरणात पार पडला आजच्या या सोहळ्यास जिल्हा परिषद गटनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते अजय मुंडे, प.पु. कांतामहाराज जोशी,वैद्यनाथ देवल कमेटीचे विश्वस्थ प्रा.बाबासर देशमुख, माजी नगराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा द्वारा सामाजिक बचतीचा हा वसा सभेद्वारा अव्याहतपणे सुरु असून युवकांच्या सांघिक ताकदीच्या बळावर उत्तरोत्तर हा सोहळा नेत्रदीपक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या