Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

कौतुकस्पद | विनोद कांबळेच्या पुढाकारामुळे पेंटर कारागीरांच्या मुलींच्या विवाहात 20 हजारची मदत

 


परळी/ प्रतिनिधी

शहरातील पेंटर कारागीरांच्या मुलींच्या विवाहात आर्थिक मदत, प्रत्येक पेंटरच्या मुलीच्या लग्न कार्यासाठी व्ही. के. कलर होमच्या वतीने 20 हजार रुपये मदत केली जाईल अशी घोषणा केली.घर सजविणारे पेंटर कारागीर यांच्यासाठीही आपण काही तरी केले पाहीजे या भावनेतून व्ही.के. कलर होमचे संचालक विनोद कांबळे यांनी केली ही मदतीची घोषणा कौतुकास्पद ठरत आहे

परळी शहरात अल्पावधीतच व ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्ही. के. कलर होम नेहमीच नवनविन योजना राबवत आले आहे. ग्राहकांच्या आवडीनुसार कलर व आकर्षक किंमतीवर व्ही. के. कलर होममधून ग्राहक आपल्या घराला सजविण्यासाठी कलर येथून कलर घेऊन जात असतात.  

दरम्यान,विनोद कांबळे यांनी केलेल्या घोषणेचे सर्व पेंटर, कारागीर आदींकडून कौतुक होत आहे. व्ही.के.कलर होमचे संचालक विनोद कांबळे यांच्या वतीने शुक्रवार दि. 12 मे रोजी  जे. एस. डब्ल्यू. पेंट कंपनीचे क्वालिटी  न्यू व्हरायटी कंपनीचे नवीन प्रॉडक्ट लॉन्च करण्यात आले. . ग्राहक कस्टमर यांच्यासाठी कंपनीने राबवलेले विविध उपक्रम सवलती आणि कंपनीचा विश्वास या संदर्भात  जे. एस. डब्ल्यू पेंट च्या वतीने दुकानदार  विनोद कांबळे यांच्या माध्यमातून  परळी शहरातील तालुक्यातील सर्वच पेंटर, कॉन्ट्रॅक्टर  यांची भव्य मीटिंग व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

या कार्यक्रमादरम्यान सुरुवातीला शहरातील सुप्रसिद्ध पेंटर , कारागीर स्व.नितीन यांचे अकाली निधन झाल्यामुळे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 


कार्यक्रमात त्यांच्या आठवणींना उजाळा देत आपल्यातील एक व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड निघून गेल्याने अनेकांनी दुःखद भावना व्यक्त करत जमलेल्या  सुमारे पेंटर,कॉन्ट्रॅक्टर जेएसडब्ल्यू पेंट मॅनेजर रवि शिंग सर  औरंगाबाद व त्यांच्या समवेत आलेले सहकारी आदींनी कालवश नितीन उजगरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. 

याच दरम्यान अनेकांनी आपापल्या भावना व्यक्त करत असताना  नितीन उजगरे अतिशय गरीब व हलाखीची परिस्थिती असणारा व्यक्ती होता संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावरती होती.  त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावरती शोककळा पसरली आहे नितीन यांच्या कुटुंबास फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून व्ही.के कलर होम चे संचालक विनोद कांबळे यांनी दहा हजार रुपयाची आर्थिक मदत जाहीर केली. 

त्याचबरोबर उपस्थित पेंटर यांच्या  प्रत्येक मुलीच्या विवाहासाठी  प्रत्येकी 20 हजार रुपये आर्थिक मदत देण्याचे ठरवले आहे. कार्यक्रमाला पेंटर युनियनचे  अध्यक्ष पिराजी कीर्ते,सचिव   सीनियर पेंटर कॉन्ट्रॅक्टर आदींसह अनेकजण मोठ्या संख्येने उपस्थित होते.  


यावेळी प्रत्येक पेंटर कॉन्ट्रॅक्टर यांना विनोद कांबळे यांच्याकडून (एक घड्याळ वॉच भेट )म्हणून देण्यात आले  व सर्वांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक  विनोद कांबळे यांनी तर मार्गदर्शन रवी सिंग सर यांनी केले. 

यावेळी कॉन्ट्रॅक्टर ओम मिरकीले , योगेश मुंडे आदींसह अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सूत्रसंचलन प्रेम जगतकर यांनी केले. शेवटी सर्वांचे आभार विशाल  कांबळे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या