Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

ऐन उन्हाळ्यात परळीकर नागरिक महावितरणमुळे त्रस्त | चंदुलाल बियाणी


परळी शहरात विज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा आंदोलन-चंदुलाल बियाणी

33 केव्ही सबस्टेशन, जिर्ण झालेल्या लाईनची दुरुस्तीसह विविध मागण्यांचे महावितरणला निवेदन



परळी/ प्रतिनिधी-

परळी शहरातील विज पुरवठा मागील महिनाभरापासून दिवसभरात अनेक वेळा सतत खंडित होत असून यामुळे ऐन उन्हाळ्यात सर्वसामान्य परळीकर नागरिक त्रस्त झाला आहे. सध्या लगीनसराईचे दिवस असून या कार्यक्रमावरही विज खंडित होण्याच्या प्रकारामुळे नाराजीचे सूर उमटत आहेत. स्थानिक नागरिकांनी महावितरणच्या या अनास्थायी कारभाराबाबत संतप्त प्रतिक्रीया दिल्या असून परळी शहरातील विज  पुरवठा तातडीने सुरळीत करावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हा उपाध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी दिला आहे.


उपकार्यकारी अभियंता, विज वितरण कंपनी यांना एक निवेदन देण्यात आले असून त्यात म्हटले आहे की, सुमारे दीड लाख लोकसंख्येच्या व 30 हजारांवर विज ग्राहक असलेल्या परळी वैजनाथ शहरात गेल्या महिनाभरापासून सातत्याने विज पुरवठा खंडित होत आहे. दिवसभरात कितीवेळा लाईट जाते हे मोजणेसुद्धा अवघड असून दीर्घकाळ विज पुरवठा बंद राहतो, यामुळे ऐन उन्हाळ्यात सर्वसामान्य परळीकर नागरिक त्रस्त झाला आहे. शहर व परिसरातील व्यापार उद्योगांवर विजेच्या लपंडावाचा विपरीत परिणाम होत आहे. 


दरम्यान, शहरातील विज ग्राहकांना सुरळीत विज पुरवठा करावा तसेच परळीसाठी नविन 33 के.व्ही. सबस्टेशन मंजूर करावे, मंजूर असलेल्या ट्रान्सफार्मर व लाईनचे काम तातडीने सुरु करावे, शेतीपंपाचे रोहित्र जळाल्यानंतर शेतकरी स्वखर्चाने बसवत असून इतर साहित्य त्यांना विकत घ्यावे लागते यावर ठोस उपाय योजना करावी, नव्या डी.पी.ला मंजूरी द्यावी, जिर्ण तारा बदलाव्यात, नादुरुस्त ट्रान्सफार्मर व केबल दुरुस्त करावे, मागणीनुसार स्वतंत्र फिडर द्यावेत अशा आशयाचे एक निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी दिले आहे.  या निवेदनाच्या प्रति कार्यकारी अभियंता अंबाजोगाई, उपविभागीय अधिकारी परळी, पोलीस निरीक्षक परळी शहर यांना देण्यात आले आहे.


जड वाहतूक बायपासने करा

रा.कॉ. जिल्हा उपाध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी उपविभागीय अधिकारी परळी यांना एक निवेदन दिले असून जड वाहतूक परळी शहरातून न करता बायपास रस्त्याने करावी व संभाव्य अपघात टाळावे यासाठी आपण प्रशासनास सूचना द्याव्यात असे या निवेदनात म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या