Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

 सिंदफणा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सीबीएसई दहावी व  बारावी परीक्षेत घवघवीत यश 

१०० टक्के निकालाची परंपरा कायम 





माजलगाव /आपला पेपर 


येथील विद्याभवन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सिंदफणा पब्लिक स्कूलच्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादित करून 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखल्याबद्दल सर्व स्तरातून सिंदफणा पब्लिक स्कूल वर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


सविस्तर वृत्त असे की, मार्च- एप्रिल २०२३ दरम्यान सीबीएसई कडून दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा घेण्यात आल्या. यामध्ये सिंदफणा पब्लिक स्कूलच्या दहावीतील एकूण 85 विद्यार्थ्यांनी  ही परीक्षा दिली. एकूण विद्यार्थ्यांपैकी मोहम्मद शेख जाएद हा विद्यार्थी ९७.४० टक्के गुण घेऊन शाळेतून पहिला आला. तर धनश्री कुरे या विद्यार्थिनीने ९६.८० टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक पटकाविला. तसेच अर्जुन शिंदे हा  विद्यार्थी ९५.८० टक्के गुण घेऊन तृतीय आला.  विशेष बाब म्हणजे ९० टक्क्याहून जास्त गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २० असून ८० ते ९० टक्क्यामधे ३४ विद्यार्थी आहेत. तर ७० ते ८० टक्के यामध्ये गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २४ एवढी आहे. 

बारावी बोर्डाच्या परीक्षेत विज्ञान शाखेतून सिद्धी डाके ही  विद्यार्थिनी ८२.६० टक्के गुण घेऊन प्रथम आली तर अनुजा भावसार या विद्यार्थिनीने ८२.४० टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक पटकावला. वाणिज्य शाखेतून हेमंत वांडेकर हा विद्यार्थी ७५.४० टक्के गुण घेऊन प्रथम आला तर आर्यन कंटुले याने 73 टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक पटकावला. शाळेच्या बारावी विज्ञान व वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के लागला असून शंभर टक्के निकालाची परंपरा यावर्षी देखील शाळेने कायम राखली आहे. 


 या घवघवीत  यशासाठी शाळेच्या सचिव मंगल सोळंके, समन्वयक नीला देशमुख, प्राचार्य अन्वर शेख, उपप्राचार्य राहुल कदम तसेच सर्व शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या