Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

ह.भ.प.कु.जनाई महाराज कोकाटे यांचे 1जून रोजी किर्तन

वै.माऊली महाराज चाकरवाडीकर यांच्या 23 व्या पुण्यस्मरणार्थ

परळी /प्रतिनिधी

दै.मराठवाडा साथी परिवार, बियाणी परिवार व अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहातील पाचव्या दिवसाचे किर्तन ह.भ.प.कु.जनाई महाराज कोकाटे यांचे किर्तन एकविसाव्या शतकातील महान संत प.पु.गुरुवर्य वै.ज्ञानेश्वर  माऊली दादा चाकरवाडीकर यांच्या पुण्यस्मरणार्थ सप्ताहाचे आयोजक श्री चंदुलालजी बियाणी, सतिश बियाणी, अ.भा.वारकरी मंडळाचे राज्य उपाध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे, दै.मराठवाडा साथी परिवार, बियाणी परिवार व अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने औद्योगिक वसाहत परळी वैजनाथ येथे बाल किर्तनकार कु.जनाई महाराज कोकाटे यांचे दि.1 जुन रोजी राञी 8 ते 10 या वेळेत किर्तन होणार असल्याचे ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांनी माऊली भक्तगण व श्रोतेगण मंडळींनी किर्तनास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे. 

दि.3 जुन रोजी ह.भ.प.तुकाराम महाराज मुंडे शास्ञी यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे. व नंतर महाप्रसाद होणार असल्याचे  दै.मराठवाडा साथी परिवार, बियाणी परिवार व अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने कळवले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या