Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत गावठी पिस्टलसह एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात

 


परळी आपला ई पेपर

परळी शहरात विनापरवाना बेकायदेशीर रित्या स्वताचे गावठी पिस्टल व तिन जिवंत काडतुसह कमरेला कब्जात ठेवुन बाळगतांना मिळुन आला म्हणुन परळी शहर पोलिसात आज रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यात आरोपीसह एक पिस्टल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे

पोहेकॉ/562 पो.ठा.परळी शहर येथे फिर्यादी भास्कर गंगाधरराव केंद्रे वय 49 वर्षे व्यवसाय नौकरी पोहेकॉ/562 पो.ठा.परळी शहर यांच्या फिर्यादीवरून आरोपी सोमेश्वर ज्ञानोबा शहाने वय 24 वर्षे रा. किर्ती नगर परळी या आरोपीस अटक केली असून अधिक तपास सुरू आहे


परळी शहरात आज दि.20/04/2023 रोजी दुपारी 2.35 वा. चे सुमारास आझाद चौक ते शिवाजी चौक कडे जाणारे रोडवर हनुमान चौक येथे एक युवक गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती सदरील ल पोलिसांना मिळाल्यानुसार संशोध युवकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याकडे एक स्टीलची बाँडी असलेली गावठी पिस्टल ज्यास खाली स्टीलची मँग्झीन असलेली, सदर पिस्टलचे मुठेवर दोन्ही बाजुने फायबर थी चॉकलेटी रंगाची प्लेट त्यावर दोन्ही बाजुनी स्टार चे चिन्ह असलेली पिस्टल, त्याची मॅग्झीन उघड पाहता मँग्झीनमध्ये तिन जिवंत काडतुस पिस्टल किंमत 20,000/- रुपये व प्रत्येकी काडतुस किंमत 300/- रुपये प्रमाणे एकुण काडतुस किंमत 900/- असे एकुण 20,900/- रुपये.


यातील आरोपी हा विनापरवाना बेकायदेशीर रित्या स्वताचे गावठी पिस्टल व तिन जिवंत काडतुसह कमरेला कब्जात ठेवुन बाळगतांना मिळुन आला म्हणुन परळी शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

यातील आरोपी हा विनापरवाना बेकायदेशीर रित्या स्वताचे गावठी पिस्टल व तिन जिवंत काडतुसह कमरेला कब्जात ठेवुन बाळगतांना मिळुन आला म्हणुन परळी शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

परळी शहर पोनि कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक प्रमुख भास्कर केंद्रे,गोविंद भताने, गोविंद यलमटे हे अधिक तपास व चौकशी करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या