Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

मुकुंद पुजा विधी साहित्य भांडारचा उद्या शुभारंभ

 


आपला ई पेपर

परळी शहरात पुजा विधीचे सर्व साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध असणार्या मुकुंद पुजाविधी साहित्य भांडारचा शनिवार दि.22 एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या शुभहुर्तावर मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ होत असुन या कार्यक्रमास नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन गोपाळ आंधळे व आंधळे परिवाराच्या वतिने करण्यात आले आहे.

परळी हे बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभु वैद्यनाथाचे स्थान असुन या स्थानास धार्मिकदृष्या अनन्यसाधारण महत्व आहे.परळी शहरात अनेक धार्मिक विधी भक्तिभावाने केले जातात परंतू यासाठी लागणारे साहित्य एकाच ठिकाणी मिळत नसल्याने असंख्य नागरीकांना हे विधी करता येत नाहीत.परळीकरांची हीच गरज ओळखून गोपाळ रावसाहेब आंधळे व आंधळे परिवाराच्या वतिने जीजामाता उद्यान ते बसस्थानक रोडवर ओम बँगल्स च्या समोर,अरुणोदय मार्केट येथे मुकुंद पुजाविधी साहित्य भांडार हे दालन सुरु करण्यात येत आहे. याठिकाणी धार्मिक विधीच्या सर्व साहीत्यासह देव सजावटीचे साहित्य,सर्व प्रकारचे ग्रंथ,स्तोत्रे,रुखवत एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.मुकुंद पुजाविधी साहित्य भांडारचा मित्ती वैशाख शु.2 अक्षय तृतीयेच्या शुभहुर्तावर शनिवार दि.22 एप्रिल रोजी होत असुन या निमीत्त पानसुपारी कार्यक्रमास दुपारी 12 ते सायंकाळी 7 या वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन गोपाळ आंधळे,सौ.शुभांगी गोपाळ आंधळे,मुकुंद गोपाळ आंधळे व आंधळे परिवाराच्या वतिने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या