Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

दादाहरी वडगाव येथे वीज पडून एक महिला जागीच ठार

 


परळी /प्रतिनिधी 

परळी तालुक्यातील दादाहरी वडगाव या ठिकाणी आज सायंकाळी विजेच्या कडकडाटासह किरकोळ पाऊस पडला यामध्ये एका महिलेच्या अंगावर वीज पडून ती महिला जागीच ठार झाल्याची घटना आज संध्याकाळच्या वेळी  घडली आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास परळी तालुक्यामध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला होता. 

यावेळी परळी - गंगाखेड रोडवरील दादाहरी वडगाव या ठिकाणी संगीता शिवाजी आमले वय ५५ रा वडगांव दादाहारी ता परळी  महिला शेतातून घरी जात असताना वीज पडून मयत झाली. ह्या घटनेने दादाहरी वडगाव परिसरात शोककळा पसरली असून मयत महिलेचा प्रेत शवविच्छेदन करण्यासाठी परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या