Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत माजी मंञी पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थित

 



अमृत महोत्सवी गौरव सोहळा होणार...


आपला ई पेपर /परळी

मा.पंकजाताई गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय सचिव,भाजपा व मा.खा.डॉ.प्रितमताई गोपीनाथराव मुंडे प्रदेशउपाध्यक्ष- भाजपा,प्रमुख अतिथी तसेच अनेक मान्यवरही उपस्थितीत परळी वैजनाथ येथील सामाजिक व राजकिय क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्तीमत्व विकासराव डुबे व दत्ताप्पा ईटके यांचा  दि.2 मार्च 2023 रोजी अमृत महोत्सवी गौरव सोहळयाचे आयोजन लोकनेते  गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदीर,येथे साय.5 वा आयोजन करण्यात आलेले आहे.


सामाजीक कार्य व राजकिय कार्य करत असतांना फळाची अपेक्षा न करता आयुष्यभर ज्यांनी जनतेसाठी व पक्षासाठी आपले आयुष्य झिजवले ज्यांच्या परळीच्या शैक्षणिक,सामाजिक आणी राजकीय कार्यात सिहांचा वाटा आहे असे परळीचे सुपुत्र विकासराव रामचंद्रराव डुबे व दत्ताप्पा गणपतअप्पा ईटके यांचा लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदीर येथे गुरुवार रोजी सायंकाळी 5.00 वाजता अमृत महोत्सवी गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.


परळी तालुका भारतीय जनता पार्टी व तसेच  या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मा.पंकजाताई गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय सचिव,भाजपा व मा.खा.डॉ.प्रितमताई गोपीनाथराव मुंडे प्रदेशउपाध्यक्ष- भाजपा, अनेक मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.

तेंव्हा या अमृत महोत्सवी गौरव कार्यक्रमाला परळी परिसरातील सर्व नागरीकांनी उपस्थित राहावे असे अवाहन स्वागतध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या