Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळी पोलिसांनीची कौतुकस्पद कामगिरी... गावठी पिस्तूलसह एकास घेतले ताब्यात...

 परळी पोलिसांनीची कौतुकस्पद कामगिरी... गावठी पिस्तूलसह एकास घेतले ताब्यात...



आपला ई पेपर / परळी 

परळी शहरात सध्या याञेची गर्दी असताना सुरक्षितता काळजी म्हणून सर्तक असलेले परळी शहर पोलिसांनी एकास विनापरवाना गावठी पिस्तूलसह एकाला परळी शहर पोलीसांनी ताब्यात घेतले  आहे. 

दि.19 रोजी 8 वा चे सुमारास परळी ते अंबाजोगाई महामार्गवर परळी वै. येथे आरोपीला पोलीसांनी ताब्यात घेतले तो परळी आंबेजोगाई महामार्गावर फिरत असताना आढळून आला होता.

याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहीतीनुसार, आरोपी उमेश निरंजन दामा वय 43 वर्ष रा. रविवार पेठ अंबाजोगाई हा विनापरवाना बेकायदेशीर रित्या स्वताचे कमरेला गावठी बनावटीचे पीस्टल व दोन जिवंत काडतुसासह बाळगलेले असतांना मिळुन आला. त्याच्याकडून पिस्टल किंमत 17000/- रुपये व प्रत्येकी काडतुस किमत 300/- रुपये प्रमाणे एकुण 17600/- रुपयचा माल हस्तगत करण्यात आला आहे.


याप्रकरणात फिर्यादी भास्कर गंगाधरराव केंद्रे वय 49 वर्षे व्यवसाय नौकरी पोहेकॉ /562 पो.ठा. परळी शहर यांच्या फिर्यादीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक तपास सुरू आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या