Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

दै.मराठवाडा साथीच्या ४३व्या वर्धापन दिनानिमित्त आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते परळी भूषण,बाल धमाल पुरस्कारांचे वितरण

 


दै.मराठवाडा साथीच्या ४३व्या वर्धापन दिनानिमित्त आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते परळी भूषण,बाल धमाल पुरस्कारांचे वितरण



दत्ताभाऊ बारगजे, आनंदग्रामच्या सौ.संध्याताई बारगजे यांचीही उपस्थिती


  आपला ई पेपर / परळी

  दै.मराठवाडा साथीच्या ४३ व्या वर्धापनदिना निमित्त विद्यार्थ्यांसाठी आयोजित बाल धमाल स्पर्धेतील विजेत्यांना तसेच परळी भूषण पुरस्कार, विशेष सन्मान व पारितोषिक वितरण समारंभ , गुरुवार दि.२३ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.


  माजी राज्यमंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. तर प्रमुख पाहुणे आनंदग्राम प्रकल्पाचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ बारगजे, संचालिका सौ.संध्या ताई बारगजे उपस्थित राहणार आहेत.  दै.मराठवाडा साथीचे मुख्य संपादक चंदुलाल बियाणी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार आहे.



दै.मराठवाडा साथीच्या वतीने ४३ व्या वर्धापन दिनानिमित्त परळी भूषण पुरस्कार वितरण सोहळा आज दि.२३ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.  


यंदा वर्ग-१च्या अधिकारी व ज्येष्ठ साहित्यिक डॉ.मंजुषा कुलकर्णी, ज्येष्ठ उद्योजक व समाजसेवक विजय सामत, प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ.रामदास रामदासी, ज्ञानबोधिनी विद्यालयाचे प्राचार्य लक्ष्मण मुंडे, सामाजिक कार्यकर्त्या व कवयित्री सौ. दीपा बंग यांचा परळी भूषण पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.


संजय देशमुख, वैद्यनाथ विद्यालयाचे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक, ज्येष्ठ समाजसेवक भिवा बिडगर, राजस्थानी मल्टीस्टेटचे आयटी सेल प्रमुख अनंत भाग्यवंत यांचा गौरव करण्यात येणार आहे.


गुरुवार दि २३ फेब्रुवारी सायंकाळी ५ वा.बक्षीस वितरण वैद्यनाथ सहकारी औद्योगिक वसाहत सभागृह, नाथ रोड येथे होणार आहे.


याच कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी आयोजित ७ दिवसीय बाल धमाल स्पर्धेचे पारितोषिक वितरणही होणार आहे.संपादक सतीश बियाणी, बाल धमाल समन्वय समितीचे प्रमुख ओमप्रकाश बुरांडे, प्रशांत प्र.जोशी यांनी या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या