Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ पंकजाताई मुंडे यांची कसब्यात पदयात्रा

 तीन पक्ष एकत्र आले तरी  कसबा, चिंचवड  भाजपकडेच कायम राहणार | पदयात्रेत उत्स्फूर्त स्वागत दोन्ही मतदारसंघ काढले पिंजून




आपला ई पेपर / पुणे 

महाविकास आघाडीच्या माध्यमातून तीनही पक्ष एकत्र आले तरी कसबा आणि चिंचवड हे दोन्ही मतदारसंघ भाजपचा गड राहिलेले आहेत,पोट निवडणुकीनंतर ते कायम आमच्याकडेच राहतील असा विश्वास भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला. कसब्याचे उमेदवार हेमंत रासने हे मोठया मतांनी विजयी होतील असेही त्या म्हणाल्या.


    कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपा व मित्र पक्षाचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या वतीने आज पदयात्रा काढण्यात आली, त्यावेळी शाहू चौकात मतदारांशी संवाद साधतांना त्यांनी हेमंत रासने यांना विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले.  


प्रारंभी  भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिराचे दर्शन घेऊन पदयात्रेला सुरवात करण्यात आली. यावेळी आमदार माधुरीताई मिसाळ यांचेसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. आंग्रेवाडा येथे पत्रकार व परिसरातील नागरिकांनाही  त्यांनी संबोधित केले. 


  यावेळी बोलतांना पंकजाताई म्हणाल्या की, कसबा आणि चिंचवड या दोन्ही ठिकाणी आमचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. विजयासाठी प्रत्येकाने कंबर कसली आहे. सगळेजण अत्यंत आत्मविश्वासाने निवडणुकीला सामोरे जात आहेत. हे दोन्ही मतदारसंघ भाजपचे गड आहेत आणि ते कायम राहतील. 


हेमंत रासने यांचा जनसंपर्क दांडगा आहे, सर्व सामान्य माणसांची कामे करण्याची त्यांची हातोटी आहे, त्यामुळे भरघोस मतांनी त्यांना विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.


ठिक ठिकाणी महिलांकडून औक्षण

-------------

पंकजाताईंच्या या पदयात्रेला मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. ठिक ठिकाणी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. आंग्रेवाडा येथील महिला बांधवांनी औक्षण करून मोठ्या उत्साहाने त्यांचे स्वागत केले.


माळी समाजाचा मेळावा

------------

भाजपा ओबीसी आघाडी प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष  योगेश टिळेकर यांनी आयोजित केलेल्या माळी समाजाच्या मेळाव्यास पंकजाताईंनी संबोधित करून रासने यांना विजयी करण्याचे आवाहन केले. आ. माधुरी मिसाळ, आ. सुनील कांबळे, मृणालिनी हेमंत रासने यांच्यासह माळी समाजाचे नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


तीन दिवसांपासून तळ ठोकून ; दोन्ही मतदारसंघ काढले पिंजून 

---------

पंकजाताई मुंडे गेल्या तीन दिवसांपासून पुण्यात तळ ठोकून आहेत.  प्रचार सभा, काॅर्नर बैठका, रॅली, वैयक्तिक भेटी यांसह कसबा आणि चिंचवड हे दोन्ही मतदारसंघ त्यांनी  पिंजून काढले. 


लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांना मानणारा मोठा वर्ग याठिकाणी असल्याने भाजपच्या उमेदवाराला याचा चांगला फायदा होणार आहे. दोन्ही ठिकाणी भाजपचा उमेदवार विजयी व्हावा यासाठी त्या कठोर मेहनत घेत आहेत. 

••••

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या