Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत मोफत डिजीटल श्रवणयंत्र (कानाची मशीन) वाटप शिबीर डाॅ.संतोष मुंडे

 महाशिवरात्री व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त 


मोफत डिजीटल श्रवणयंत्र (कानाची मशीन) वाटप 21 ते 26 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी 28 फेब्रुवारी रोजी शिबीर

आपला ई पेपर/परळी

महाशिवरात्री व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आ.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत डिजीटल श्रवणयंत्र (कानाची मशीन) वाटप शिबीर  आयोजित करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेशउपाध्यक्ष तथा धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना अध्यक्ष डाॅ.संतोष मुंडे यांनी दिली आहे.

       अपंगांचे कैवारी म्हणून ओळख असलेल्या व विविध सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर राहून विविध आरोग्य शिबिरे व उपक्रम राबवणारे प्रसंगी दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेशउपाध्यक्ष तथा धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना अध्यक्ष डाॅ.संतोष मुंडे यांच्यावतीने मंगळवार, दि. २८ फेब्रुवारी रोजी स्थळ : डॉ. संतोष मुंडे यांचे श्रीनाथ हॉस्पिटल, अरुणोदय मार्केट समोर, परळी वै. मोफत डिजीटल श्रवणयंत्र (कानाची मशीन) वाटप शिबीर आयोजित करण्यात आले आहे.कमी ऐकु येणाऱ्या नागरीकांसाठी ७ ते ८ हजार रुपये किंमतीचे १०० मोफत डिजीटल श्रवणयंत्र (कानाची मशीन) वाटप  या शिबीरात केले जाणार आहे. यापूर्वीही अशा प्रकारच्या शिबीरांचे आयोजन करुन आतापर्यंत  सुमारे 4000 डिजीटल श्रवणयंत्र (कानाची मशीन) वाटप मोफत करण्यात आलेले आहे.


      दरम्यान, दि.२१ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत नाव नोंदणी व पूर्व तपासणी करुण घेणे. तसेच नाव नोंदणी करतांना आधार कार्ड झेरॉक्स सोबत आणणे. परळी तालुक्यातील गरजु नागरिकांना प्राधान्य.

 ज्यांची तपासणी झाली आहे. त्याच गरजु नागरीकांना दि. २८ फेब्रुवारी रोजी डिजीटल यंत्राचे वाटप केले जाणार आहे. तरी गरजूंनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेश उपाध्यक्ष तथा धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजना अध्यक्ष डाॅ.संतोष मुंडे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या