ओळखपत्रावर वैद्यनाथ प्रभूंचे आज दर्शन घेता येईल-चंदुलाल बियाणी
आपला ई पेपर /परळी
महाशिवरात्र यात्रेनिमित्त परळी शहर व परिसरातील भाविकांसाठी वैद्यनाथ प्रभूंचे दर्शन घेण्यासाठी महाशिवरात्रीला रात्री 10 ते मंदीर बंद होईपर्यंतची वेळ राखीव ठेवण्यात आली असून याचा सर्व शिवभक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यनाथ देवस्थान कृति समितीचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी केले आहे.
देवस्थानकडून महाशिवरात्रीच्या रात्री 10 ते मंदीर बंद होईपर्यंत कोणतेही शुल्क न भरता पासधारकांच्या रांगेतून सरळ प्रवेश दिला जाणार आहे. परळी शहर व परिसरातील भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैद्यनाथ देवस्थान विकास कृति समितीचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी केले आहे. दरम्यान, निवडणूक, ओळखपत्र, पॅनकार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, आधारकार्ड असे कोणतेही एक ओळखपत्र दर्शन घेताना सोबत ठेवावे असेही आवाहन त्यांनी केले आहे.



Social Plugin