Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

कामाच्या ठिकाणी काम,टाईम पास चालणार नाही-दीपा मुधोळ -मुंडे

 कामाच्या ठिकाणी काम,टाईम पास चालणार नाही-दीपा मुधोळ -मुंडे


आपला ई पेपर/ बीड 


बीड बिंदुसरा मोहीम सुरू होती ही समाधान मिळवणारी गोष्ट आहे. अशा मोहीम पुढे सुरूच ठेवू.

कुणालाही टार्गेट देऊन कामे करायची नाहीत. तर कामाच्या ठिकाणी काम करायचं आहे, फक्त टाईम पास नाही. पहिल्या दिवशीचा पदभार स्वीकारताना जिल्हाधिकारी यांनी दिले अल्टिमेट

 बीड, उस्मानाबाद असो की इतर ठिकाण असो,महसूल विभागाला काम जास्त असते. कारण त्यांच्यावरच जास्त विश्वास असतो. त्यामुळे सर्वांनी मिळून जिल्ह्यासाठी चांगले काम करूया असे म्हणत उपविभागीय अधिकारी यांना मोक सोडणार नाही,त्यांच्याकडुन कामाचा आढावा घेणार असल्याचे दीपा मुधोळ मुंडे यांनी म्हटले.


निरोप समारंभ कार्यक्रम बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल कर्मचारी संघटना यांच्या वतीने नूतन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांचे स्वागत समारंभ व जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमाचे बुधवारी (दि.15)आयोजन करण्यात आले होते.


यावेळी बोलताना जिल्हाधिकारी शर्मा म्हणले की,बीड जिल्हा हा वाईट नव्हे बीड जिल्ह्याची प्रतिमा करण्याचा प्रयत्न काही जणांनी केला आहे तो हाणून पाडणे गरजेचे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या