Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

मोठी बातमी |'या' किनारपट्टीवर 43 मृतदेह सापडले..

 


आपला ई पेपर | 

    इटली शहराजवळ एका बोट दुर्घटनेत 43 जनाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत अजूनही शोध कार्य सुरू असून आपत्कालीन पथक तात्काळ त्या किनारपट्टीवर पोहोचले आहे

       कॅलाब्रिया प्रदेशातील क्रोटोन शहराला लागून असलेल्या किनाऱ्यावर बोटीतील शंभरहून अधिक लोक उतरण्याच्या प्रयत्नात होते.यादरम्यान ही बोट तुटली. यामुळे मोठी जीवितहानी झाली आहे.समुद्रकिनाऱ्यावर अनेक मृतदेह सापडले आहेत.



       नागरी संघर्ष आणि गरिबीला कंटाळून लोक दरवर्षी आफ्रिकेतून इटलीत स्थलांतर करतात.ही बोट नेमकी कुठून आली आहे.हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.पण स्थानिक वृत्तसंस्थांनी असे सांगितले आहे.की याबोटीतील लोक इराण, इराक,सीरिया,अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि सोमालिया येथील होते त्यात समुद्र खवळलेला होता.यामुळे दुर्घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.

      खराब हवामान आणि समुद्र खवळलेला असताना ही बोट खडकाला धडकली आहे.असे या एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे.या दुर्घटनेनंतर इटालियन अधिकाऱ्यांनीसमुद्रात शोध आणि बचाव मोहीम राबवली.

    तटरक्षक दलाने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की सध्या 80 लोकांना जिवंत बाहेर काढण्यात आले आहे.तर काही जण बुडल्यानंतर पोहत किनाऱ्यावर पोहोचले. किनारपट्टीवर43मृतदेह सापडले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या