Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत विशेष गौरव सोहळा | विकासराव डुबे व दत्ताप्पा इटके गुरूजी यांचा 2 मार्च रोजी अमृत महोत्सवी गौरव


गौरव सोहळा | 



परळी / प्रतिनिधी

परळी भारतीय जनता पार्टीच्या कोअर कमिटीचे सदस्य विकासराव डुबे आणि दत्ताप्पा इटके गुरूजी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त गुरूवार दि.२मार्च रोजी अमृत महोत्सवी गौरव सोहळयाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती स्वागताध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी दिली. 

माजी मंत्री पंकजाताई मुंडे आणि खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर येथे सायं.५ वा.हा कार्यक्रम होणार आहे.



परळी भारतीय जनता पार्टीच्या कोअर कमिटीचे सदस्य विकासराव डुबे आणि दत्ताप्पा इटके गुरूजी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त परळी येथे अमृत महोत्सवी गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.विकासराव डुबे हे मागील अनेक वर्षापासून भाजपात कार्यरत असून वैद्यनाथ बँक अध्यक्ष,आर्य वैश्य समाजाचे विश्वस्त,परळी न.प.चे सदस्य तथा उपनगराध्यक्ष अशा अनेक पदावरकार्यरत आहेत.

भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेवर मागील १५ वर्षापासून ते संचालक आहेत.



दत्ताप्पा इटके गुरूजी मागील अनेक वर्षापासून भाजपात कार्यरत असून परळी येथील हनुमान व्यायाम शाळेची उभारणी, विविध शिबीरांचे आयोजन, वीरशैव समाजाच्या सामुहिक विवाह सोहळयाचे आयोजन, विविध सामाजिक शैक्षणिक व आरोग्य शिबीराचे आयोजन त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. श्री गुरूलिंग स्वामी बेलवाडी संस्थानचे ते अध्यक्ष असून श्री वक्रेश्वर स्वामी मंदिराचे ते विश्वस्त आहेत. परळी येथील जवाहर शिक्षण संस्थेचे सचिव म्हणून ते कार्यरत आहेत. 


वीरशैव समाजाच्या जगदगुरू व शिवाचार्यांचे तपोनुष्ठान कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करून यशस्वी करण्यात त्यांचा मोलाचा सहभाग आहे. विकासराव डुबे आणि दत्ताप्पा इटके गुरूजी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अमृत महोत्सवी गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.डुबे आणि इटके यांनी भारतीय जनता पार्टीचे काम करीत असतानाच सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून विविध क्षेत्रात मोठे काम केले आहे. त्यांच्या एकुण सार्वजनिक - कामाची उपयुक्तता लक्षात घेवून त्यांचा एकत्र सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे स्वागतध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या