Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अन् डॉक्टर प्रितमताई मुंडे संतप्त झाल्या...

 अन् डॉक्टर प्रितमताई मुंडे संतप्त झाल्या...



हलगर्जीपणामुळे रुग्णालयाच्या लौकिकाला धक्का लागू नये खा.प्रितमताई मुंडे यांनी व्यक्त केली उद्विग्न भावना ; रुग्णालयाला दिली सरप्राईज व्हिजिट



आपला ई पेपर /अंबाजोगाई 

स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या अपघात विभागात स्त्री जातीचे अर्भक आढळ्यानंतर खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांनी रुग्णालयाला सरप्राईज व्हिजिट दिली.यावेळी त्यांनी अपघात विभाग आणि इतर विभागाची पाहणी केली. रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नावारूपाला आलेल्या रुग्णालयाच्या नावलौकिकाला धक्का लागू नये अशी उद्विग्न भावना त्यांनी व्यक्त केली.


स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून झालेल्या प्रकाराची माहिती घेतल्यानंतर खा. प्रितमताई मुंडे यांनी घटनास्थळाला भेट दिली. घटनेपूर्वी अनोळखी महिला अपघात विभागात प्रवेश करते हा सुरक्षा व्यवस्थेचा नाकर्तेपणा असल्याचे खडेबोल त्यांनी प्रशासनाला सुनावले, तसेच महिला सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्याची सूचनाही त्यांनी दिली.याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करा, हा प्रकार अत्यंत गंभीर आहे, सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासनाचा हलगर्जीपणामुळे नावारूपाला आलेल्या रुग्णालयाच्या लौकिकाला धक्का लागत असेल तर असा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे त्यांनी प्रशासनाला बजावले.


यादरम्यान खा.प्रितमताई मुंडे यांनी महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या कक्षाला भेट दिली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व राज्य सरकारच्या महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना अंतर्गत स्वामी रामानंद तीर्थ शासकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे योजनेची अंमलबजावनी ,आभा कार्ड योजना आदींची सविस्तर माहीती यावेळी त्यांनी घेतली.


एमआरआय विभाग कार्यान्वित करण्यासाठी पाठपुरावा करणार


रुग्णालयातील एमआरआय विभागाच्या कार्यान्वयाचा आढावा घेऊन खा. प्रितमताई मुंडे यांनी विभागाची पाहणी केली. एमआरआय विभाग लवकरात लवकर सुरु करण्यासाठी आपण प्रयत्नशील असून विभाग  कार्यान्वित करण्याठी लागणारा उच्चदाबाचा वीजपुरवठा, आवश्यक निधी आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे खा. प्रितमताई मुंडे यांनी सांगितले.


तसेच केंद्र सरकारच्या निधींमधुन आलेल्या एमआरआय मशिन, नविन आयसीयु युनिट आणि ॲंजिओग्राफी युनिट यांबाबत खा.प्रितमताई मुंडे यांनी आढावा घेऊन समन्वयाचा अभाव असल्याबाबत डिन खैरे यांना खडे बोल सुनावले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या