वेताळ मंदिरात श्रीदत्त जन्मोत्सवाचे आयोजन...
आपला ई पेपर / परळी
शहरातील श्रीबजरंगबली वेताळ मंदिरात बुधवार दि.7डिसेंबर रोजी श्रीदत्त जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्त विविध धार्मीक कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याच्या आव्हान प.पू.विलासानंदजी महाराज यांनी केले आहे.
बुधवार दि.7डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती असून यानिमित्त श्री बजरंगबली वेताळ मंदिर येथे विविध धार्मीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी12 वाजता महाआरती व 1 वाजता महाप्रसाद होणार आहे.या सर्व कार्यक्रमास भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प.पू.विलासानंदजी महाराज व समस्त भक्तगणांनी केले आहे.


Social Plugin