Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सिंदफणा पब्लिक स्कूलमध्ये सीबीएसई व्हॉलीबॉल क्लस्टर क्रीडा स्पर्धेस उत्साहात सुरुवात....

 






सिंदफणा पब्लिक स्कूलमध्ये सीबीएसई व्हॉलीबॉल क्लस्टर क्रीडा स्पर्धेस उत्साहात सुरुवात....

आपला ई पेपर / माजलगाव

माजलगाव येथे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ नवी दिल्ली आणि सिंदफणा पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 19 वर्षाखालील मुले मुली यांच्या राज्यस्तरीय 9 th क्लस्टर व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन आज दि. 08 रोजी करण्यात आले.


 

या क्रीडा स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा सिंदफणा पब्लिक स्कूलच्या क्रीडांगणावर संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंदफणा पब्लिक स्कूलच्या समन्वयीका नीलाताई देशमुख होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून सीबीएसई बोर्डाचे बीड समन्वयक श्री शितल सर्वज्ञ सर आणि जवाहर विद्यालय, गढीचे प्राचार्य नागभूषण सर उपस्थित होते. 



मंचावरील विशेष उपस्थितीमध्ये सिद्धेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीसुहास मोराळे सर, इगलवूड स्कूलचे प्राचार्य आनंद सर, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर घुबडे  सर,गणेश नाना सोळंके हे मान्यवर उपस्थित होते.



यानंतर सीबीएसई समन्वयक जिल्हा प्रमुख शितल सर्वज्ञ सर यांच्या हस्ते सीबीएससी बोर्डाच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले तर जवाहर विद्यालय गढीचे प्राचार्य नागभूषण सर यांच्या हस्ते शाळेच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.



तसेच उपस्थित सर्व मान्यवरांना स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंनी संचालन करून मानवंदना देण्यात आली त्यानंतर सिंदफणा पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी क्रीडा ज्योत आणल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योत पेटवण्यात आली त्याच बरोबर शाळेच्या मुले व मुली यांनी स्वागत गीत व बहारदार नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली आणि जानवी रुद्रवार हिने उपस्थित सर्व खेळाडूंना क्रीडा शपथ दिली.



शाळेचे प्राचार्य अन्वर शेख सर यांनी आपल्या प्रास्ताविक पर भाषणात आलेल्या सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि पंच यांचे मराठवाड्याच्या संत भूमीत स्वागत आहे असे प्रतिपादन केले.



याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सी.बी.एस. ई शाळांचे बीड जिल्हा समन्वयक श्री शितल सर्वज्ञ यांनी खेळाडूंना  मार्गदर्शन करताना खेळाडूंनी खिलाडू वृत्तीने या स्पर्धेमध्ये  सहभागी होऊन आपले खेळातील कौशल्य विकसित करावे असे आवाहन केले तर नवोदय विद्यालय गढी चे प्राचार्य श्रीनागभूषण  यांनी या स्पर्धेचे यजमानपद सिंदफणा पब्लिक स्कूल ला मिळाले ही अतिशय गौरवाची बाब आहे असे नमूद केले व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.



आपल्या अध्यक्षीय समारोपात  निलाताई यांनी राज्यांच्या विविध विभागातून आलेल्या खेळाडूंना मराठवाडा संस्कृतीचे दर्शन होईल व खेळाडूंनी खेळकर  वृत्तीने  या क्रीडा स्पर्धेत सहभागी व्हावे  अशी अपेक्षा व्यक्त केली.

या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते प्रत्यक्ष मैदानावरती करण्यात आले.


या क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र व गोवा राज्यातून एकूण 26 संघ स्पर्धेत सहभागी झाले असून या मध्ये 16  मुलांचे संघ व 10 मुलींचे संघ सहभागी झालेले आहेत दि 08/12/2022ते 11/12/2022 पर्यंत सलग चार दिवस या स्पर्धा सुरू राहणार आहेत.


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना जाधव आणि संध्या नोकवाल यांनी  तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य राहुल कदम सर यांनी केले तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिंदफणा पब्लिक स्कूलच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या