Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

प.महाराष्ट्र,मराठवाडा आणि विदर्भात "या" दिवशी पाऊस...कोसळणार

 


प.महाराष्ट्र,मराठवाडा आणि विदर्भात "या" दिवशी पाऊस...कोसळणार

आपला ई पेपर / मुंबई 

8 आणि 9 तारखेला महाराष्ट्रासह कोकणात आणि 9 तारखेला मध्य महाराष्ट्रात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहणार असून तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य भागात दोन दिवसांपासून कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. 



त्याची तीव्रता सातत्याने वाढत असून त्याचे चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. 


चक्रीवादळाचा संभाव्य मार्ग उत्तर-पश्चिम दिशेने आहे चक्रीवादळ आंध्र प्रदेश, तामिळनाडूच्या किनारपट्टीजवळ आहे आणि या कालावधीत ते तीव्र होईल.चक्रीवादळाचा प्रभाव 11 डिसेंबरपर्यंत राहणार आहे.



दक्षिणेत 9 डिसेंबरला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.महाराष्ट्राला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने दक्षिण महाराष्ट्राच्या अनेक भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. त्याचा परिणाम दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांवर होईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या