Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अंबाजोगाईच्या शौचालयात अर्भक प्रकरणी कुमारी मातेसह 2 महिला पोलीसांच्या ताब्यात



अंबाजोगाईच्या शौचालयात अर्भक   प्रकरणी कुमारी मातेसह 2 महिला पोलीसांच्या ताब्यात

आपला ई पेपर / अंबाजोगाई 

अंबाजोगाईत स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात अपघात विभागातील  शौचालयाच्या बकेट मध्ये एक दिवसाचे स्त्री जातीचे मृत अर्भक टाकणाऱ्या कुमारी मातेला व दोन महिलांना पोलीसांनी चौकशी ताब्यात घेतले आहे.स्वाराती रुग्णालयाचा अपघात विभागाच्या शौचालयात दि 2 डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता दरम्यान येथील सफाई कर्मचारी मोहन भाई राठोड साफसफाई करत असताना लाल रंगाच्या बकेटमध्ये पाण्यात बुडालेले स्त्री जातीचे मर्त अर्भक दिसून आले होते.


सदरील कुमारी माता बीड जिल्ह्यातील असून तिच्यासह दोन महिलांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून सदरील घटनेची चौकशी सुरू आहे या कुमारी मातेने आंबेजोगाई च्या स्वार्थी रुग्णालयात त्यादिवशी आल्याचे कबूल केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या