Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

तब्बल 35 वर्षानंतर दहावीचे वर्गमित्र एकत्र स्नेहमिलन सोहळा झाला साजरा..



तब्बल 35 वर्षानंतर
दहावीचे वर्गमित्र एकत्र येत स्नेहमिलन सोहळा केला साजरा..

गाढे पिपंळगाव येथील विवेकानंद विद्यालयच्या 1987 च्या बॅचचे स्नेहमिलन संपन्न...


परळी तालुक्यातील गाढे पिपळगाव येथील विवेकानंद विद्यालय सन 1987 च्या दहावी बॅचचे वर्गमित्र तब्बल 35 वर्षानंतर एकत्र येत स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. परळी वैजनाथ येथे आग्रह हॅाटेल येथे उत्साहात दिवसभर नव्या जुन्या शालेय जिवनातील गोष्टींना उजाळा देत स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न झाले. 

शालेय मित्र भेटल्याने बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला असे मत श्री.नारायण कराड उपसचिव (उर्जा )यांनी व्यक्त केले.विवेकानंद विद्यालय विद्यार्थी-विद्यार्थीनी यांचे 35 वर्षांनतर मित्र मंडळी यांच्यावतीने  1987 च्या 10 वी वर्गमित्रांचे स्नेहमिलन रविवार, दि.30 ऑक्टोबर रोजी परळी येथे उत्साहात संपन्न झाले



मैत्रीचं जग हे एक वेगळाच विश्व असत... एक मित्र म्हटलं की आठवणी आल्या आठवणी म्हणलं की.. किस्से आले या अनेक किश्यातून... जीवन घडत. तेच जीवनातील खरे क्षण असतात.


संघर्ष तर हा प्रत्येकाला ठरलेला असतो परंतु संघर्षात सदैव साथ देणारे अव्यक्त होणारे मित्र... किंवा व्यक्त होऊन... पाठीशी उभा राहणारे मित्र या दोघांचे भूमिका... मैत्रीत तेवढीच महत्त्वाचे असते.



आज प्रत्येकजण आपआपल्या व्यवसायात व्यस्त असतो,परंतु यानिमित्ताने शाळेतील मित्र भेटल्याचा आनंद वेगळा असतो. सर्व मित्र एकत्रीत येऊन एकमेकांची विचारपुस, चर्चा, गप्पा गोष्टी यामध्ये दिवसभर वेळ कसा गेला कळले सुद्धा नाही.


दरम्यान  शाळेचे सेवानिवृत शिक्षक  व प्रमुख पाहुण्यांचा पुष्पगुच्छ व शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी उपस्थितीत विवेकानंद विद्यालयतील 1987 बॅचचे 10 वी वर्गमित्र व मैत्रीणी यामध्ये संजय काटकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी , नारायण कराड, उपसचिव, ऊर्जा विभाग, मंत्रालय, मुंबई, ॲड जगदिश तोषणीवाल, औरंगाबाद , विनायक सोनवणे, लक्ष्मण राडकर, ज्योती राडकर-काकडे, परशुराम धावणे, आशोक तिडके, अंतराम तिडके, हनुमंत सोनवणे, अनिल पांचाळ असे 60 जन उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सुत्रसंचालक श्री. नारायण कराड यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रम आयोजनात श्री. संजय काटकर, नारायण कराड, ज्योती राडकर, लक्ष्मण राडकर, विनायक, सोनवणे व अनिल पांचाळ  यांनी पुढाकार घेतला.


तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्तात्रय गुट्टे,सतिशभाऊ केंद्रे, शिवाजी मुंडे, रामदास मुंडे , बाळासाहेब मुंडे, ओमकार कराड व मित्र मंडळी  यांनी अथक परिश्रम घेतले.


या कार्यक्रमाची प्रस्तावना श्री. ॲड जगदिश तोषणीवाल यांनी मांडली तर समारोपिय भाषण श्री.संजय काटकर यांनी केले.


        तब्बल 35 वर्षापूर्वीचे वर्गमित्र-मैत्रिणी एकमेकांना भेटण्याची तीव्र इच्छा व्हावी हिच मैत्री घट असते असे मत देशमुख गुरुजी यांनी व्यक्त केले. मन पवित्र ठेऊनच आपला, नोकरी,व्यवसाय करा, शांत झोप लागेल असचं काम करा, असा सल्लाही श्री.अरुण महाराज शिंदे यांनी यावेळी दिला.तर महिलांना,मुलींना सन्मानाने वागवा,आपला संसार करत असतानाच सामाजिक भानही ठेवा, शक्य असेल तर आपल्या ऊत्पनातील काही भाग समाजातील गरजू घटकांवर खर्च करा ,असा सल्ला नानवटे गुरुजी यांनी यावेळी दिला आहे.




*जमिनीतून गूढ आवाजाचे गूढ कायम बीड सह पाटोदा अन्य गावे हादरले*

*https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_8.html


*आजच्या ब्रेकिंग न्यूज_माझा आपला@पेपर_Online All हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी*

👇👇👇

*https://aplaepaper.blogspot.com*


join my WhatsApp group: *https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr*

👇👇👇👇👇

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या