कौतुकस्पद| समाज बांधवांचा पुढाकार अन् स्मशानभूमीचा संपूर्ण कायापालट करण्याचा युवकांचा संकल्प...
आपला ई पेपर / संतोष जुजगर
परळी शहरातील वैद्यनाथ मंदिराच्या पाठीमागील बाजूस असलेली कैलास धाम यावीरशैव लिंगायत स्मशानभूमीत समाज बांधवांच्या वतीने दि 20 नोव्हेंबर पासून सामुहिक श्रमदान केले जात असून दि 27 नोव्हेंबर रोजी दुसर्या रविवारी सुद्धा 35 पेक्षा अधिक समाज बांधवांनी एकत्र येवून दोन तास श्रमदान करून परिसर स्वच्छ केला आहे.
’साथी हाथ बढाना’ या ओळीप्रमाणे परळी वीरशैव लिंगायत समाज एकत्र आला असून या सर्वांनी हातात हात देत वीरशैव लिंगायत स्मशानभूमीत या रविवारीही स्वच्छ केली.श्रमदान करून स्मशानभूमीचा संपूर्ण कायापालट करण्याचा युवकांचा संकल्प असून या परिसरात वाढलेली झाडे झुडपे,गाजर गवत आज नष्ट करण्यात आले.
स्मशानभूमीतील अडगळीत गेलेली अर्धा ते पाऊन एकर एवढी जागा जेसीबी मशिनद्वारे मोकळी करण्यात आली आहे. मागील आठवड्यापासून प्रत्येक रविवारी येथे श्रमदान केले जात असून त्यातून हा परिसर स्वच्छ आणि सुशोभित करण्याचे काम चालू आहे.पुढच्या आठवड्यातही असे श्रमदान केले जाणार असून नागरिकांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन समाज बांधवांनी केले आहे.
मानवतेचा संदेश
वैद्यनाथ मंदिराच्या मागील बाजूस कैलास धाम ही स्मशानभूमी असून या परिसरात मागील काही दिवसापासून झाडे झुडपे वाढल्याने बकाल अवस्था निर्माण झाली होती.वास्तविक पाहता मृत व्यक्तीला येथे चिर विश्रांती दिली जात असल्याने हा परिसर स्वच्छ व्हावा अशी सर्वांनाच अपेक्षा असते.





Social Plugin