Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत संचिता संदिप टाक हिची बुद्धिबळ स्पर्धेमध्ये विभागीय स्तरावर निवड देशासाठी खेळण्याचे उद्दिष्ट




संचिता संदिप टाक हिची बुद्धिबळ स्पर्धेमध्ये विभागीय स्तरावर निवड | देशासाठी खेळण्याचे उद्दिष्ट

आपला पेपर / परळी

परळी येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये शहरातील संचिता टाक ही विजयी झालेली आहे.ती फाउंडेशन स्कूलची विद्यार्थिनी आहे.या विजयाने तिची निवड विभागीय पातळीवरील स्पर्धेसाठी झाली असून याबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक केले जात आहे.येथील व्यापारी संदीप टाक यांची ती कन्या आहे


पोद्दार लर्न स्कुल येथे शुक्रवारी आयोजित तालुका स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये 11 तालुक्यातील स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला होता.यामध्ये 5 स्पर्धकांची निवड विभागीय स्पर्धेसाठी करण्यात आली.यामध्ये संचिता संदीपराव टाक या विद्यार्थिनींचा सहभाग आहे.


या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष विजयप्रकाश तोतला,फाऊंडेशन स्कुल चे प्राचार्य दत्ता नरहारे सर,गजानन नागझरे सर,क्रीडा शिक्षक ओम मेनकुदळे, बुद्धिबळाचे प्रशिक्षक तपके,वर्गशिक्षक राहुल गुट्टे यांनी अभिनंदन केले आहे.


विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत फाऊंडेशन स्कुल मधून निवड झालेली टाक ही पहिलीच विद्यार्थीनी आहे.विश्वनाथ आनंद माझे आदर्श आहेत,भावाकडून बुद्धिबळ शिकले.शाळेतील शिक्षकांनी खेळासाठी प्रोत्साहन दिले म्हणूनच हे यश भेटले आहे.कुटूंबातील सदस्यांचे खेळासाठी पाठबळ असल्याचे संचिता ने सांगितले.पुढे देशासाठी खेळण्याचे उद्दिष्ट असल्याचेही ती म्हणाली यासाठी परिश्रम घेत असल्याचे तिने सांगितले.वडील संदीप टाक व संपूर्ण परिवाराने तिच्या या यशाचा आनंद व्यक्त केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या