परळीत कुठलीही शिकवणी नसताना मिळवले यश,गोर गरीब कष्टकरी पालकांच्या चेहऱ्यावर फुलला आनंद
आपला@पेपर /परळी
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे याच संदेशाच्या माध्यमातून गोर गरीब होतकरू कष्टकऱ्यांची मुलांनी आज कुठलीही शिकवणी नसताना केवळ स्वतःच्या ज्ञानावर शालेय शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले आहे. त्यांच्या या यशाचे कौतुक कष्टकऱ्या आई-वडिलांना अधिक असल्यामुळे त्यांना प्रेरणा देण्यासाठी म्हणून आज त्यांचा गौरव करण्यात आला.
वडसावित्री परिसरातील शालेय शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांनाचा गती मल्टिसर्व्हिसेसच्या वतीने गुणगौरव करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ क्रिडा शिक्षक नानेकर सर,संत तुकाराम गृहनिर्माण संस्थेचे सचिव वसंतराव सूर्यवंशी,गती मल्टिसर्व्हिसेस संचालक सचिन भांडे यांच्या हस्ते चि.समर्थ सुपले, प्रिया जोगदंड,वेदांत कापसे,हर्षदा सुरवसे या विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी परिसरातील नागरिक व पालक उपस्थित होते.


Social Plugin