Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

सुवर्णकन्येचा नागरी सत्कार परळीकरांसाठी हा ऐतिहासिक सुवर्ण क्षण ठरणार...

 



सुवर्णकन्येचा नागरी सत्कार
परळीकरांसाठी हा ऐतिहासिक सुवर्ण क्षण ठरणार...

माजी मंत्री धनंजय मुंडे,माजी मंत्री पंकजाताई मुंडे मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती

परळी कु.श्रद्धा रवींद्र गायकवाड यांच्या कन्येच्या या सोहळ्याची यशस्वी तयारी अहमदाबाद येथे झालेल्या 36 व्या राष्ट्रीय खेळांमध्ये "स्केट बोर्ड" च्या क्रीडा प्रकारात पदक. तिची ऑलिम्पिकसाठी निवड झाली आहे. हा जल्लोष आज साजरा करण्यासाठी सर्व परळीकरांसाठी हा ऐतिहासिक सुवर्ण क्षण आहे.


दि.१४ नोव्हेंबर रोजी या सुवर्ण कन्येचा भव्य नागरी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. परळीच्या सुवर्ण कन्येचा माजी मंत्री आ.धनंजय मुंडे,माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते व मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात येणार आहे.याकार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


दि.14 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 4:00 वाजता.लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर,परळी वैजनाथ येथे होणार आहे.धनंजय मुंडे,माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते नागरी सत्कार यांच्या हस्ते होणार असून समारंभाच्या प्रमुख पाहुण्या अंबाजोगाईच्या अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती एस.चंद्रजित जाधव,अमेरिकेतील 


विद्यापीठात निवड झालेला भारतातील एकमेव विद्यार्थी टी.आकाश पोपळघाट, उपजिल्हाधिकारी सौ.नम्रता चाटे, बीड जिल्हा क्रीडा अधिकारी सौ.सुहासिनी देशमुख,तहसीलदार सुरेश शेजूळ,परळीच्या माजी नगराध्यक्षा सौ.सरोजनीताई हालगे, न.प. प्रशासक व प्राचार्य एस.ए.बोंदर, सुप्रसिद्ध साहित्यिक व गझलकार प्रा.डॉ.मुकुंद राजपंखे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमाकांत कस्तुरे, संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


 त्यांच्या परळी येथील मुलीच्या कौतुक सोहळ्यास उपस्थित राहून तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन सुवर्णकन्या श्रद्धा गायकवाड नागरी सत्कार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या