Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळी न.प.मध्ये | गोरगरीबांवर अन्याय | एका कुटुंबाचा आरोप |

 


परळी न.प.च्या याकारभाराने
गोरगरीबांवर अन्याय त्रस्त.. एका कुटुंबाचा आरोप

परळी नगरपरिषदेत सावळा गोंधळ चालला असून सर्वसामान्य व गोरगरीब जनतेस न्याय मिळणे अवघड झाले असून अशा कारभाराने गोरगरीब भरडला जात  जात आहे अशी संताप जनक प्रतिक्रिया नुकताच राजस्थान येथे मृत्यू पावलेल्या शर्माजींच्या कुटुंबाने व्यक्त केला आहे.


त्यांच्या परिवारातील निकटवर्ती यांनी  दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी असे म्हटले आहे की...

   "अशोककुमारकडे मृत्यू प्रमाणपत्र नाही"

सदर प्रकरणाचे गांभीर्याने अवलोकन केले असता एकीकडे अशोककुमार शर्मा हे म्हणतात की पापालाल उर्फ बजरंगलाल यांचा राजस्थान मध्ये १९६७ साली मृत्यू झाला तसे त्यांनी शपथ पत्रही दिलेले आहे तर दुसरीकडे त्यांचाच नातेवाईक असलेला भाऊ जुगलकिशोर हरिप्रसाद हे म्हणतात की पापालाल उर्फ बजरंगलाल यांचा मृत्यू राजस्थानमध्ये १९९० साली झाला तसेच त्यांनीही शपथपत्र दाखल केले आहे. स्वतः नातेवाईक समजणाऱ्या दोघाही भावा भावात नेमका मृत्यू कधी झाला याबाबत मतभेद आहेत. त्याचबरोबर त्यांच्याकडे पापालाल उर्फ बजरंगलाल यांचे मृत्यू प्रमाणपत्र देखील नाही ही बाब या ठिकाणी उल्लेखनीय आहे.



याबाबत त्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार सविस्तर माहिती अशी की,मूळचे


परळीचे मात्र उदरनिर्वाहासाठी इचलकरंजी या ठिकाणी गेलेले राजगोपाल विष्णुदास गुडगिल्ला (शर्मा )यांचे आजोबा पापालाल उर्फ बजरंगलाल किशनलाल गुडगिल्ला (शर्मा)यांची राजस्थानमध्ये राताढुंडा मध्ये सात एकर कोरडवाहू जमीन आहे.


सदरची जमीन सोडून ते ६० ते ७० वर्षांपूर्वी परळीस आले.बजरंग लाल यांना पापालाल ह्या टोपण नावाने देखील संबोधले जायचे. पापालाल उर्फ बजरंगलाल यांच्या राजस्थान मधील शेतीवर गावातीलच त्यांच्या समाजाचे अशोक कुमार मोहनलाल शर्मा आणि जुगलकिशोर हरिप्रसाद यांचा डोळा होता असा आरोप परिवाराने केला आहे


पापालाल उर्फ बजरंगलाल परळीस येण्यापूर्वी पुष्कर येथील खाते वही लिहीनार्यांकडे वंशावळ लिहीत माझा नातू राजगोपाल हा असल्याचे नमूद केले आहे. पापालाल उर्फ बजरंगलाल यांचे १९८५ साली दुःखद निधन झाले. त्यावेळी नगरपरिषदेमधील मृत्यू नोंद रेस्टॉरमध्ये नोंद करताना त्यांच्या टोपण नावाने आणि समाजाच्या नावाने नोंद करण्यात आली ती अशी पापालाल किशनलाल सारस्वत. राजस्थानमध्ये आपल्या आजोबाची जमीन असल्याचे कळल्यावरून राजगोपाल यांनी परळी नगर परिषदेकडून रीतसर शपथपत्र आधारे पापालाल उर्फ बजरंगलाल यांच्या मृत्यू नोंद रजिस्टर मध्ये झालेली चूक दुरुस्त करून घेत नियमानुसार सुधारित मृत्यू प्रमाणपत्र काढले.


संबंधित लिपिक विकास जगतकर यांनी नियमानुसार सुधारित मृत्यू प्रमाणपत्र दिले मात्र त्यांच्या कामाच्या व्यापामुळे झालेली दुरुस्ती ही मृत्यू अभिलेखा रजीस्टर मध्ये करण्याचे राहून गेले, अशी स्पष्ट कबुली त्यांनी परळीच्या मुख्याधिकाऱ्यांनी काढलेल्या नोटिसीला उत्तर देताना दिली आहे. मात्र पापालाल उर्फ बजरंगलाल यांच्या राजस्थान मधील जमिनीत वर डोळा असलेल्या अशोककुमार मोहनलाल शर्मा यांनी परळी नगरपरिषदेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांना चिरीमिरी देत नियमानुसार दिलेले मृत्यू प्रमाणपत्र रद्द केले. 



वास्तविक पाहता राजस्थान मधील परबतसर न्यायालयाने पिलवा पोलीस ठाणे यांनी दिलेला तपास ग्राह्य धरून अशोककुमार शर्मा यांचे जवाबासह त्यांचे नातेवाईक जुगल किशोर हरिप्रसाद यांचा अर्ज फेटाळीत राजगोपाल शर्मा यांनी कोणतेही बोगस काम केलेले नाही असा निकाल दिला. 


सदरचा पोलीस तपास आणि न्यायालयाचा निकाल जोडत पुन्हा पापालाल उर्फ बजरंगलाल किशनलाल गुडगिल्ला शर्मा अशी दरुस्ती करून प्रमाणपत्र देण्याची मागणी केली असता सर्व पुरावे देऊन देखील परळी नगरपरिषदेने  प्रमाणपत्र दिले नाही. 


शेवटी राजगोपाल गुडगिल्ला शर्मा यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे रीट अर्ज दाखल केला.सदर अर्जाची सुनावणी होऊन खंडपीठाने १० ऑगस्ट २०२२ रोजी परळीच्या मुख्याधिकाऱ्यांना त्वरित सुनावणी घेऊन कोणत्याही परिस्थितीत निर्णय घेण्याची सूचना दिली.


हायकोर्टाच्या आदेशानुसार मुख्याधिकाऱ्याने सुनावणी घेतली सुनावणीच्या वेळी अर्जदार राजगोपाल शर्मा यांच्या वतीने एडवोकेट राजेश डिगोळे आणि एडवोकेट आबासाहेब साळुंके यांनी भक्कम पुराव्यानिशी आपले म्हणणे सादर केले त्यातच आक्षेप करता अशोक कुमार शर्मा यांनी देखील आपले सादर केले. मात्र मुख्याधिकारी यांनी राजगोपाल गुडगिल्ला शर्मा यांच्या वतीने वकिलांनी मांडलेले म्हणणे विचारात न घेता अक्षेपकर्ता अशोक कुमार शर्मा यांच्या वतीने तथ्यहीन म्हणणे ग्राह्य धरीत एकतर्फे निकाल दिला.


 ही बाब सर्वसामान्य गरीब राजगोपाल विष्णुदास गुडगिल्ला शर्मा यांच्यावर अन्यायकारक ठरत असून धनदांडग्या अशोक कुमार शर्मा यांचीच बाजू घेतल्याचे स्पष्ट होते.ह्या निकालावरून परळी नगरपरिषदेची भूमिका अशी का?परिस्थिती निर्माण झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या