Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

जगणं ही फक्त दहा अक्षरांची कविता आहे | आशय सांगणारे काव्य..|




'प्रेम उठाव' हा नवनाथ रणखांबे यांचा  आकाराने छोटाखानी व आशयानी 
समृद्ध असा काव्यसंग्रह. सर्वांच्याच  जिव्हाळ्याचा विषय म्हणजे 'प्रेम'  या प्रेमाला घेऊनच श्रीनवनाथ रणखांबे  यांनी उठाव केला आणि तो सर्वांर्थानी कवीच्या  प्रतिभेची  उंची दाखवणारा आहे . 

            कवीचे निरीक्षण, अनुभव , शब्द भांडार , जाणिवा सगळेच कांही समृद्ध आहे. तरीही नम्रता हा कविचा  गुण पदोपदी जाणवतो.

'हृदयाने माझ्या
खूपच साठवले
लेखणीला मात्र
थोडेच आठवले'



असे म्हणत  अजून खूप कांही लिहिण्यासारखे आहे.  हे नम्रपणे कवीने मान्यच  केले आहे. कवीचा प्रामाणिकपणा या ठिकाणी प्रकर्षाने दिसून येतो . 
          अडीज अक्षरी   असणाऱ्या ' प्रेम ' या शब्दाने  सर्वानाच भुरळ पाडली आहे.  प्रेम केले नाही असा माणूस सापडणे दुर्मिळ.  प्रेमातील अनेक भावनांचा अनुभव साऱ्यांनीच घेतला आहे. प्रेमात विरह, दुरावा, आठवणी, ओलावा,ओढ, दुःख , राग , रुसवा - फुगवा,  असं सारं काही असतं. हे सगळं असल्याशिवाय प्रेम खुलत नाही. 'प्रेम उठाव'  या काव्यसंग्रहात  हे सगळं आलं आहे .



             'प्रेम  उठाव' कविता संग्रहाचे  कवी श्री नवनाथ रणखांबे हे कवितेत पुरते बुडलेले आहेत. त्यांची जगणं ही फक्त दहा अक्षरांची कविता आहे .  कमी शब्दात जास्त आशय सांगणे हे कसब कवीचं आहे. कविता मुक्त  छंदात तर आहेतच शिवाय व्याकरणातील वृत्ताचा ही उल्लेख अनेक ठिकाणी आहे . याचाच अर्थ कवीचे मांडणं शास्त्रशुद्ध आहे. अभ्यासू आहे.  



           समृद्धीकडे चला , विधवान व्हा, प्रगती करा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार अनेक कवितांमधून  डोकावतो.  कवी या वाटेवरून प्रामाणिकपणे चालत आहे याची साक्ष देतो.
          काव्यसंग्रह छोटा असला तरी योद्धा, गझल भीम बाबा , माय माऊली , देश, समाज आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रियकर , प्रेयसी प्रेम यामध्ये आहे. सर्व समावेशक काव्यसंग्रह कवींनी बनवला आहे. वाचकांना, त्यांच्या बुद्धीला तो खाद्य देणारा तर आहेच , शिवाय कवितेच्या विश्वात प्रवेश करणाऱ्या, कविता लिहू पाहणाऱ्या महाविद्यालयीन नवकवींना मार्गदर्शन करणारा आहे .
          मित्र नवनाथ  रणखांबे यांच्या  या प्रेम उठाव कविता संग्रहाला शुभेच्छाच, शिवाय भावी लेखनासाठीही शुभेच्छा !

प्रेमाचा रंग उघडणाऱ्या कविता : प्रेम उठाव*

( पुस्तक परीक्षण -: संजय वसंतराव वारके )

पुस्तक -: प्रेम उठाव
किंमत :- ९०/-  ₹
कवी :- नवनाथ रणखांबे
प्रकाशन :- शारदा प्रकाश ठाणे
पुस्तक परीक्षण -: संजय वसंतराव वारके,
काकासाहेब माने हायस्कूल, रूकडी.
तालुका  -:   हातकणंगले
जिल्हा -: कोल्हापूर,  पिन -  ४१६ ११८

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या