Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत चंपाषष्टीनिमित्त सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हाराचा गजर..

 






परळी चंपाषष्टीनिमित्त सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हाराचा गजर.. 

आपला ई पेपर / परळी

शहरातील खंडोबा मंदिरात मंगळवार,दि२९ रोजी चंपाषष्टीनिमित्त सकाळपासून सायंकाळपर्यंत भाविकांच्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.आज चंपाषष्ठी निमित्त खंडोबा मंदिरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली यामध्ये परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


तसेच या पालखीचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आले. परळी शहरातील अनेकांचे आराध्य दैवत व कुलदैवत चंपाषष्टीनिमित्त खंडोबा मंदिरात पहाटे ४ ते ७ वाजेपर्यंत भाविकांनी खंडोबा देवाला महाअभिषेक पूजा अर्पण करून दर्शनासाठी गर्दी केली होती.


सायंकाळी खंडोबा मंदिरातही महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील अनेक भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या