Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

स्व.विनायक मेटे यांच्या मृत्यूप्रकरणी चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल चौकशी सुरू

 *अपघातात टायरखाली दबल्याने*

*एकाचा जागीच मृत्यू आई-वडील गंभीर जखमी*

https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_78.html*


स्व.विनायक मेटे यांच्या
मृत्यूप्रकरणी चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल चौकशी सुरू 

स्व.विनायक मेटे यांच्या कारला 14 ऑगस्ट 2022 रोजी पहाटे पाच वाजता मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात झाला.  नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात नेले, त्यांना दाखल करण्यात आले. मात्र तेथे विनायक मेटे यांना मृत घोषित करण्यात आले होते.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन परिस्थितीची माहिती घेतली.मेटे यांच्या मृत्यूची सखोल चौकशी केली जाईल, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना जाहीर केले. काही दिवसांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना या मृत्यूची सीआयडी चौकशी करून निष्कर्ष सादर करण्याचे आदेश देण्यात आले. 


त्यानंतर सीआयडी या प्रकरणाचा तपास करत होती. विनायक मेटे यांची गाडी ज्या मार्गावरून गेली होती त्या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज सीआयडी तपासत होते. याशिवाय आयआरबीचे अभियंते आणि तांत्रिक अभियंते यांची एक टीम तयार करून यात तुम्हाला कोणाचा दोष दिसतो,याबाबत त्यांचे मत जाणून घेण्यात आले.


सीआयडीने पाहिलेल्या फुटेजमध्ये चालक ताशी 120 ते 140 किमी वेगाने गाडी चालवत असल्याचे दिसून आले. अपघात होण्याच्या काही वेळापूर्वी चालक एकनाथ कदम याने उजवीकडे वळण घेत ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्याला ओव्हरटेक करता येणार नाही हे माहीत असतानाही त्याने ओव्हरटेक केले आणि त्याचा परिणाम डाव्या बाजूला कोसळला. सीआयडीच्या तपासात या बाबी उघडकीस आल्यानंतर त्यांनी कारचालकाविरुद्ध रासणी पोलिसात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या