Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत चेंबरी विश्राम गृहा जवळील पुल दोन्ही बाजूने बाभळीने व्यापला...

 परळीत चेंबरी विश्राम गृहा जवळील पुल दोन्ही बाजूने बाभळीने व्यापला बाभळी काढण्याचे मागणी विजय दहिवाळ

अपघात घडून लोक मृत्यूमुखी पडले आहेत. यापुढेही अपघात होण्याची दाट शक्यता आहे. भविष्यातील दुर्घटनेच्या गोष्टी टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने यावर तात्काळ लक्ष घालून रस्ता मोकळा करावा अशी मागणी भाजप युवा नेते विजय दहिवाळ यांनी केली आहे.


परळी-बीड हा राज्य रस्ता आहे. या रस्त्यावरुन दररोज शेकडो वाहनांची ये- जा चालू असते. शहरातील चेमरी विश्राम गृहाजवळील रस्त्याच्या शेजारील असलेल्या बाभळीच्या झाडांमुळे रस्त्यावर बऱ्याच प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. सदरील रस्ता बाभळीमुळे अरुंद झाला असून मोठे वाहन समोरुन जवळ येईपर्यंत वाहनधारकास किंवा पादचाऱ्यास समजत नाही. यामुळे अपघाताची शक्यता जास्त प्रमाणात आहे. तसेच पुलाच्या एका बाजूचे संरक्षक कठडे मोठ्या प्रमाणावर तुटून पडले असून हे सुद्धा प्रवाशांसाठी अतिशय धोकादायक आहे तरी ताबडतोब या पुलावरील बाभळी काढून रस्ता पूर्ववत करावा व बाजूचे संरक्षक कठडे ताबडतोब बसवावेत अशी मागणी भाजपा युवा नेते विजय दहिवाळ यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या