Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अपघातात टायरखाली दबल्याने एकाचा जागीच मृत्यू आई-वडील गंभीर जखमी

 *CID तपासात | ओव्हरटेकमुळे अपघातात स्व.मेटे यांचा मृत्यू*

*चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल चौकशी सुरू*

https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_40.html


अपघातात टायरखाली दबल्याने एकाचा जागीच मृत्यू आई-वडील गंभीर जखमी


केज तालुक्यातील कोल्हेवाडी येथील ऊस तोड मजूर कुटुंब येडशी जिल्हा उस्मानाबाद येथील कारखान्यात ऊस तोडणीसाठी गेले होते.आज बुधवारी दि.16 सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टर-आयशर टेम्पोच्या अपघातात एक जण जागीच ठार झाला, तर आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत.


याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की,तालुक्यातील कोल्हेवाडी येथील मिसाळ कुटुंब उस्मानाबाद जिल्ह्यातील येडशी येथील साखर कारखान्यात ऊस तोडणीसाठी गेले होते. 


त्यांचा स्वतःचा ट्रॅक्टर असल्याने आई-वडील आणि मुलगा मजुरीचे काम करतात.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत एका कुटुंबाने काबाडकष्ट करून ट्रॅक्टर विकत घेतला आहे.पहाटे तिघेही ट्रॅक्टरमध्ये चढत असताना मागून येणाऱ्या आयशर टेम्पोने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली.


 त्यामुळे ट्रॅक्टर रस्त्याच्या खाली गेला.चालक ज्योतिराम सुनील मिसाळ वय 24 वर्षे रा.कोल्हेवाडी ता. केज येथे टायरखाली पडून घटनास्थळीच तर वडील सुनील ज्ञानोबा मिसाळ (वय ४५ वर्षे), आई सत्वशाला सुनील मिसाळ (वय ४० वर्षे),रा.कोल्हेवाडी (नि. केज) हे गंभीर जखमी आहेत.त्यांच्यावर उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या