Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

धक्कादायक नंदीग्राम एक्स्प्रेस रेल्वे समोर उडी मारून प्रेमी युगुलाची आत्महत्या

 


नंदीग्राम एक्स्प्रेस रेल्वे समोर उडी
मारून प्रेमी युगुलाची आत्महत्या 

आदिलाबादहून मुंबईकडे जाणाऱ्या ‘नंदीग्राम एक्स्प्रेस’ रेल्वेखाली उडी घेऊन दोघांनी  आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना भोकर शहरातील रेल्वे फाटकजवळ घडली आहे. शिवराज क्यातमवार आणि धारा मोरे असे आत्महत्या केलेल्या प्रेमी युगल नाव आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही वेगवेगळ्या जातीचे होते.याशिवाय घरच्यांना त्यांच्या प्रेमाविषयी काहीच माहिती नव्हती आणि दोघांनाही भीती वाटत होती की जर घरच्यांना हे प्रेम कळले तर विरोध होईल. या भीतीपोटी त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. 


भोकर स्थानकाजवळ नंदीग्राम एक्स्प्रेस येताच त्याने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. या अपघाताची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांचे पोलिस निरीक्षक सुरेश उनवणे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. 


मृतदेह भोकर येथील शासकीय रुग्णालयात आणून शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी रेल्वे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. 


*तब्बल ५७ विवाह मुहूर्त..*

*| नोव्हेंबर महिन्यापासूनच विवाह सोहळे धूमधडाक्यात सुरू होणार*


*https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_80.html

*ब्रेकिंग न्यूज_माझा आपला@पेपर_Online All हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी*


👇👇👇


*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या