Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीकरांकडून कौतुकाची "श्रद्धा" ओसंडून वाहिली....

 




परळीकरांकडून
कौतुकाची "श्रद्धा" ओसंडून वाहिली....

परळीत भव्य क्रीडांगण उभे करणार |आ.धनंजय मुंडे 

श्रद्धा खरंच आत्मविश्वासाचे प्रतिक ठरली |पंकजाताई मुंडे


परळी शहरात राहूनच श्रद्धा प्रमाणे उत्तुंग नावालौकीक करणारे खेळाडू निर्माण व्हावे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून मागणी होत असलेले क्रीडांगण लवकरच परळीत उभे राहील.यासाठी नगर परिषदेने आठ एकर जागा आरक्षित केली असून भव्य क्रीडांगण उभे राहणार असल्याचे माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी सांगितले.







तर स्वाभिमान सन्मान व आत्मविश्वासाचे प्रतीक परळीची लेक बनल्याचा आपल्याला अभिमान असून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने तिच्यासाठी ब्लँक चेक तयार केला आहे.अशी घोषणा भाजपा राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी केली.सुवर्णपदक विजेती श्रद्धा गायकवाड हिचा तमाम परळीकरांच्या वतीने शानदार सोहळ्यात नागरी सत्कार करण्यात आला.


यावेळी मान्यवर बोलत होते. एकप्रकारे या सुवर्णकन्येच्या नेत्रदीपक नागरी सत्कार सोहळ्यात परळीकरांकडून कौतुकाची "श्रद्धा"ओसंडून वाहिल्याचे चित्र पहावयास मिळाले


• माय भूमीतील कौतुकाने व प्रोत्साहनाने सुवर्णकन्या भारवली

• नागरी गौरव समितीच्या वतीने श्रद्धा गायकवाड तिचे आई-वडील यांचा यथोचित गौरव

• सुवर्णकन्या श्रद्धा गायकवाडचा शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह मानपत्र देऊन गौरव

•परळीतील सर्व स्तरीय व सर्व समावेशक भव्य दिव्य सोहळा

•सुवर्णकन्या श्रद्ध गायकवाड ची भव्य सत्कार रॅली; ठिक ठिकाणी परळीकरांनी केले स्वागत

• माजी मंत्री धनंजय मुंडे व माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या एकत्रित उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधले

• 'आपण परळीकर, या एका सूत्रात तमाम परळीकर एकवटले

•ढोल ताशा व औक्षण करून मान्यवरांचे स्वागत

•नेत्रदीपक सोहळा व सर्व स्पर्शी आयोजन ठरले लक्षवेधी

•श्रद्धा गायकवाडच्या पुढील कारकीर्दीसाठी मदतीचा ओघ सुरू

हो आताही थेट live कु. श्रद्धा गायकवाड सत्कार लाईव्ह*

*थेट मोबाईलवर पाहू शकता*
https://aplaepaper.blogspot.com/2022/11/live.html

*संतोष बारटक्के*
*9423472426*  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या