Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीच्या झोपलेल्या वन विभागाला पक्षी मित्रामुळे जाग आली...?

 


परळीत काही पक्षी हिमाचल प्रदेश,उत्तराखंड मधून आकाश विहार करीत काही दिवस मुक्कामाला येतात...


शहर व परिसरात पक्षीमित्रांनी केले पक्षनिरीक्षण... आढळले अनेक दुर्मिळ पक्षी

आपला @पेपर/ परळी

परळीच्या झोपलेल्या वन विभागाला पक्षी मित्रामुळे जागा आली...? ज्येष्ठ पक्षीतज्ञ पक्षी कोशाचे जनक मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिवस (५ नोहेंबर) व (१२ नोव्हेंबर) हा पद्मभूषण डॉ.सलीम अली यांचा जन्मदीवस हा सप्ताह पक्षी मित्र गौरव सप्ताह म्हणून साजरा केला जातो परंतु परळीतील वन विभागाला या सप्ताहाचे विसर पडला होता की काय म्हणून उशिरा जागे झालेल्या वन विभागाची पक्षी मित्रांमुळे झोप उडाली आहे.



यानिमित्त येथील पक्षीमित्र भूषण पाठे यांनी शहर व परिसरात पहिल्यांदाच पक्षीनिरीक्षण केले,या पक्षी निरीक्षणात अनेक दुर्मिळ पक्षी व स्थलांतरित पक्षी आढळून आले.


येथील औष्णिक विद्युत केंद्रातील अभियंता व पक्षी मित्र भूषण पाठे यांनी परळी व परिसरातील पर्यावरणाचे व पक्षांच्या विविध प्रजातींचे निरीक्षण केले असून या पक्षी निरीक्षणात अनेक दुर्मिळ पक्षी व तलावावर स्थलांतरित पक्षी आढळले आहेत. 


भूषण पाठे हे बॉम्बे नॅचरल सोसायटी व भारतीय पक्षी मित्र संघटनेचे आजीव सभासद आहेत. पाठे यांनी परळी परिसरातील शहरापासून जवळच असलेल्या वसंतनगर वनक्षेत्र,चांदापुर साठवण तलाव,विविध बंधारे, दगडाच्या खदानी आदी ठिकाणी सातत्याने प्रत्यक्ष जाऊन पक्षांचे निरीक्षण केले आहे. 


पक्षी मित्र पाठे यांना या पक्षी निरीक्षणात कंठवाला पोपट, माळ चिमणी, वटवट्टया, कुदळया, पाण टीलवा, लाला बुडी भिंगरी, बुलबुल, ठोकरी, रान होला, बगळा, वेडा राघू, तुरेवाला चंडोल, माळ मुनिया, भारतीय करवानक, व्हलगड पान कावळा, कंठेरी चिखल्या, नकल्या खाटीक, तलवार बदक, थापट्या बदक, जांभळा शिंजिर, पारवा, गुलाबी मैना, चक्रवाक, क्षलाल चंडोल, शिक्रा, सापमार गरुड, राखी बदक, बंड्या धीवर, थोरला धोबी अशी अनेक प्रजाती आढळून आलेल्या आहेत.










 


या पक्षी निरीक्षणामध्ये यातील काही पक्षी हिमाचल प्रदेश, उत्तराखंड मधून आकाश विहार करीत परळी मध्ये दरवर्षी येत असल्याचे दिसून आले आहे. पक्षी निरीक्षणात जवळपास ३० च्या वर पक्षांच्या प्रजाती दिसून आल्या असून यामध्ये अनेक दुर्मिळ पक्षी आढळून आले आहेत. यासंदर्भात येथे पहिल्यांदाच पक्षीनिरीक्षण करण्यात आल्याने परिसरात असलेल्या पक्षांची माहिती मिळाली आहे.


यासंदर्भात पक्षीमित्र भूषण पाठे यांनी पक्ष निरीक्षणासंदर्भात बोलताना सांगितले की, महाराष्ट्र पक्षी मित्र तसेच बॉम्बे नॅचरल सोसायटी त्याचप्रमाणे निसर्ग संवर्धनाची आवड असल्यामुळे शनिवार व रविवार सुट्टीच्या दिवशी पक्षी निरीक्षण करण्यासाठी जात असतो


परळीच्या आजूबाजूच्या परिसरातील विविध ठिकाणी हिमालयातून येणारे बरेच प्रवासी पक्षी भलेही त्यांची संख्या कमी असो परंतु तरीही  आढळून आलेली आहे. 

यात चक्रवाक,तलवार बदक, थापाट्या बदक, काळ्या डोक्याची शराटी, शेकाट्या हे पक्षी स्थलांतरण करून परळीच्या भूमीत पाहुणे म्हणून वास्तव्यास येतात.पक्षी निरीक्षण करताना जवळपास ३० पक्षाच्या प्रजाती आढळल्या आहेत तर अनेक दुर्मीळ पक्षीही आढळून आले आहेत. या सर्व पक्षांचे शासनाच्या वतीने संवर्धन होणे अत्यंत आवश्यक आहे.


*ब्रेकिंग न्यूज_माझा आपला@पेपर_Online All हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी*


https://chat.whatsapp.com/140YmpzD7mEGQsD2bONWfr

*हेडलाईन्स न्यूज*
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या