Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

धक्कादायक विवाहित महिलेवर बलात्कार |5 जणांवर गुन्हा दाखल |आरोपी फरार

बीड


विवाहित महिलेवर बलात्कार |5 जणांवर गुन्हा दाखल | आरोपी फरार | पोलिसांचा शोध सुरू

आपला@पेपर बीड/ प्रतिनिधी 

बलात्कारातील आरोपी हे मूळ बीड जिल्ह्यातील असल्याची माहिती पीडितेने पोलिसांना दिली व गुन्हा दाखल झाला असून आरोपींचा शोध सुरू झाला आहे. पोलिसांची पथके बीड जिल्ह्यात दाखल झाली आहेत.ही घटना नुकतीच घडली आहे.


औरंगाबाद येथील चिकलठाणा परिसरात पोलिसात पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार शेंद्रा येथील एका लॉजवर सतत दोन दिवस पाचजणांनी बलात्कार केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. दि 2 नोव्हेंबर मध्यरात्री 12 वाजेपासून दि 3 नोव्हेंबर सकाळी 8 वाजेपर्यंत तीन आरोपांनी तिच्यावर वारंवार बलात्कार केला. आरोपींनी मुलीला मारण्याची धमकी देत पीडितेला शेंद्रा परिसरात असलेल्या एका लॉजवर घेऊन गेले होते.


 सदरील अत्याचाराची वाच्यता केली तर,आरोपींनी महिलेला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली होती. घडलेल्या प्रकारानंतर आरोपींच्या तावडीतून महिलेने  सुटका करत चिकलठाणा पोलीस स्टेशन येथे धाव घेतली.तिच्या सोबत घडलेल्या सर्व प्रकार पीडितेने पोलिसांना सांगितला. 


या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून चिकलठाणा पोलिसांनी तीन नराधमांसह एकूण पाच जणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.महिलेवर बलात्कार करून आरोपी फरार झाले आहेत अशी माहिती मिळते आहे.


*2023 मध्ये तब्बल ५७ विवाह मुहूर्त..*

*| नोव्हेंबर महिन्यापासूनच विवाह सोहळे धूमधडाक्यात सुरू होणार*



*https://aplaepaper.blogspot.com/2022/11/blog-post_80.html



*ब्रेकिंग न्यूज_माझा आपला@पेपर_Online All हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी*


👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com*

*संतोष बारटक्के*
*9423472426*


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या