Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

या पेट्रोल पंपाजवळ घडला अपघात | ट्रॉलीवर दुचाकी धडकली |दुचाकीस्वार जागीच ठार

 


या पेट्रोल पंपाजवळ घडला अपघात | ट्रॉलीवर दुचाकी धडकली |दुचाकीस्वार जागीच ठार

आपला ई पेपर / केज

केज येथे ऊस भरून साखर कारखान्याकडे निघालेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीस दुचाकी धडकली. याअपघातात दुचाकी चालक तरुण गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाल्याची घटना केज मांजरसुंबा रस्त्यावर मस्साजोग पेट्रोल पंपाजवळ रविवारी रात्री घडली आहे.


केज तालुक्यातील पिसेगाव येथील आकाश राजाभाऊ नेहरकर हा तरुण रविवारी रात्री दुचाकीवरून एम. एच. ४४ जे. ७४३५ मांजरसुंब्याकडून केजकडे येत होता. या रस्त्यावरील मस्साजोगजवळील देशमुख पेट्रोल पंपासमोर त्याची दुचाकी आली होती. 


त्याच्या समोर ऊस भरलेले ट्रॅक्टर एम.एच.२५ जी.२२८१ हे साखर कारखान्याकडे चाललेले होते. याचवेळी दुचाकीची ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला पाठीमागून जोराची धडक बसल्याने या अपघातात दुचाकीवर आकाश राजाभाऊ नेहरकर हा तरुण गंभीर जखमी जागीच मरण पावला. 


या घटनेची माहिती मिळताच मस्साजोग बिट जमादार त्रिंबक सोपणे,पोलीस नाईक महादेव बहिरवाल यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या