Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

skater Girl | एक परळीकर म्हणून श्रद्धाचा अभिमान वाटतो- बाजीरावभैया धर्माधिकारी


परळीच्या कु.श्रद्धा गायकवाडने जिंकले सुवर्ण पदक

अहमदाबाद येथे संपन्न झालेल्या ३६ व्या नॅशनल गेम्स स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविण्यासाठी यशोगाथा श्रद्धाच्या संघर्षावर आणि स्केटिंगच्या पॅशन वर Netflix ने skater Girl नावाचा चित्रपट देखील प्रदर्शित केलेला आहे. skater Girl | एक परळीकर म्हणून श्रद्धाचा अभिमान वाटतो- बाजीरावभैया धर्माधिकारी यांनी व्यक्त केल्या सोशल मीडियावर आपल्या भावना..



अहमदाबाद येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत परळीच्या  कु.श्रध्दा रविंद्र गायकवाड हिने "स्केट बोर्डिंग" या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले असून तिची "स्केट बोर्डिंग" या क्रीडा प्रकारात फ्रांस मध्ये होणाऱ्या ऑलम्पिक मध्ये भारतीय संघात निवड झाली आहे. 


बाजीराव धर्माधिकारी यांनी या कु. श्रद्धा बद्दल बोलताना व्यक्त केली ही भावना रविंद्र गायकवाड हे माझे बालमित्र आहेत. कु.श्रद्धा गायकवाड या आपल्या परळीच्या लेकरान परळीचे नाव संपूर्ण भारत देशात गाजविले आहे.


परळीचे सुप्रसिध्द जाहिरात समालोचक बालाजी गायकवाड यांची ती पुतणी असून रविंद्र गायकवाड हे श्रद्धाचे वडील आहेत,ते पुण्यामध्ये एका मैदानावर खाजगी कंपनी मध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात.अतिशय बिकट परिस्थिती मधून श्रद्धाने ही कामगिरी पूर्ण केली आहे.एक परळीकर म्हणून श्रद्धाचा अभिमान वाटतो.


फ्रांसमध्ये होणाऱ्या ऑलम्पिकमध्ये  श्रध्दाने सुवर्णपदक जिंकावे आणि आपले परळीचे नाव संपूर्ण विश्वात करावे ही शुभकामना!!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या