Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

आज निर्णय ..? चिन्ह गोठल्यास |ठाकरे समर्थक 'या' चिन्हाचा वापर तर शिंदे गट 'हे' निवडणूक चिन्ह वापरतील..?

 







चिन्ह गोठल्यास |ठाकरे समर्थक 'या' चिन्हाचा वापर तर शिंदे गट 'या' निवडणूक चिन्ह वापरतील..?

सध्या सत्तासंघर्षात शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर आता शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात पक्ष वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे. 

शिवसेना कोणाचा पक्ष आहे? धनुष्य आणि बाण कोणाचे प्रतीक आहे? निवडणूक आयोग यासंदर्भात निर्णय घेणार असतानाच मुंबईसह अन्य प्रमुख शहरांतील महापालिका निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. 


अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यामुळे दोन्ही गटांनी आपापली पर्यायी पक्ष चिन्हे निश्चित केल्याचे बोलले जात आहे. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यास उद्धव ठाकरे समर्थक गदा चिन्हाचा वापर करतील अशी शक्यता आहे. 


बुधवार 5ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दसरा मेळाव्यात शिंदे गटाने मंचावर भव्य व्यासपीठ आणले होतेत्यामुळे धनुष्यबाण चिन्ह गोठल्यास शिंदे गट तलवार चिन्हाचा वापर करू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजे येत्या निवडणुकीत दोघांनाही वेगवेगळी निवडणूक चिन्हे घेऊन आपले अस्तित्व सिद्ध करायचे होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या