Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

विकासासाठी | "मी परळीकर" म्हणून काय करू शकतो | विचार करण्यासाठीची बैठक...

 




संपूर्ण परळी तालुक्याच्या विकासासाठी मी परळीकर काय करू शकतो या अनुषंगाने परळी वैद्यनाथ प्रभूच्या पावन भूमीच्या विकासाची वेळ आली आहे... असा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून याबाबत काय आहे बातमी चला तर मग वाचूया

"मी परळीकर" म्हणून काय करू शकतो | विचार करण्यासाठीची बैठक...

सप्रेम नमस्कार,

परळीतील प्रभू वैद्यनाथाच्या पावन भूमीच्या विकासाची वेळ आली आहे. देशभरात वेगवेगळे धार्मिक कॉरिडॉर विकसित होत आहेत. या प्रकल्पात मंदिरांचे “संरक्षण आणि जतन” करण्यासाठी आणि आधुनिक तंत्रज्ञानाची प्राचीन श्रद्धेशी जोडण्यासाठी एक मॉडेल असते.


याचा थेट चांगला परिणाम होतो तो संपूर्ण गांव आणि परिसरातील जनतेच्या नागरिकांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी. काशी विश्वनाथ, उज्जेन असे मोठे उदाहरण आहेत त्यामुळे त्या ठिकाणी दररोज लाखो भाविक भक्त दर्शनासाठी जातात. या संपूर्ण प्रक्रियेत तेथील स्थानिकांना प्रचंड प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. सर्व प्रकारच्या बाजारपेठ उत्तम सुरू आहेत.


आधुनिक काळात धार्मिक आणि कृषी पर्यटन हे आपल्या विकासाचे उत्तम पर्याय आहेत पण गरज आहे ती आपल्या सर्वांच्या ईच्छाशक्तीची. शासन प्रशासन नक्की मनावर घेईल पण त्यासाठी आपण प्रयत्न सुरू करून सातत्य ठेवणे अगत्याचे आहे. 


या अनुषंगाने "मी परळीकर" म्हणून काय करू शकतो याचा विचार करण्यासाठी पहिली बैठक आयोजित केली आहे. यासाठी कोणी एक व्यक्ती नेतृत्व करणार नाही, या सामाजिक विकासाच्या प्रक्रियेत प्रत्येकजण एक आवाज असेल.


दिनांक : 30 ऑक्टोबर 2022

वेळ : सकाळी 11 वाजता

स्थळ : राष्ट्रमाता जिजामाता उद्यान, परळी वैजनाथ


जय भोलेनाथ, जय वैद्यनाथ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या