Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

यु टर्न | पोलिस भरतीची प्रक्रिया सुरु होणार असतानाच आज सरकार अचानक यु टर्न का ?


पोलिस भरती पुढेढकलली,महासंचालकांकडून पत्रक जारी

राज्याच्या पोलिस मुख्यालयातून कालच दि.28 पोलिस भरतीसाठी प्रवर्गनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले होते.त्यानंतर आज लगेच भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याचा निर्णय घेतल्याने नोकरीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या तरुणांना धक्का बसला आहे.


नुकतेच तरुण वर्गामध्ये पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी म्हणून पुढील महिन्यात14,956 जागांसाठी पोलिस भरतीची प्रक्रिया सुरु होणार असतानाच आज अचानक यु टर्न घेतल्यामुळे. राज्यातली पोलिस भरती पुढे ढकलल्याची माहितीसमोर येत आहे.प्रशासकीय कारणास्तव पोलिस भरतीची प्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आली आहे.


नव्याने जाहिरात प्रसिद्ध होणार


पोलिस महासंचालक कार्यालयाकडून तसे पत्रक जारी करण्यात आलं असून,त्यात प्रशासकीय कारणास्तव पोलिस भरती प्रक्रिया पुढे ढकलल्याचं सांगण्यात आलं आहे.पोलिस भरतीसंदर्भात लवकरच नव्याने जाहिरात प्रसिद्ध केली जाणार असल्याचे समजते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या