Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

अंबाजोगाईत खोल दरीत उडी मारून 20 वर्षीय युवकाची आत्महत्या...



अंबाजोगाईत खोल दरीत उडी मारून 20 वर्षीय युवकाची आत्महत्या...



अंबाजोगाई मुकुंदराज परिसरातील व्ह्यू पॉईंटवरून खोल दरीत उडी मारून 20 वर्षीय युवकाने आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना आज सोमवारी दि.31 सकाळी पावणेआठ वाजताच्या सुमारास घडली आहे. दिनेश नरेश लोमटे (रा. कोष्टी गल्ली,अंबाजोगाई)असे त्या मयत युवकाचे नाव असल्याचे समजते.

आज पहाटेच अचानक दिनेश आत्महत्या करण्यासाठी मुकुंदराज
परिसराकडे धावत सुटला होता.
पाठीमागून त्याची आई त्याच्या मागे धावत होती.त्याला रोखण्यासाठी आरडाओरडा करत  होती.



हे पाहून तिथे मॉर्निंग वॉकसाठी त्या परिसरात फिरायला गेलेले  पत्रकार दत्ता आंबेकर,बालाजी खैरमोडे,मारुती जोगदंड आणि अशोक दळवे यांनी दिनेशला थांबून. त्याची समजूत घातली. तो काही काळ शांत झाल्याचे पाहून त्याला त्याच्या आईजवळ सोडून सर्वजण निघून गेले.


मात्र,थोड्याच वेळात दिनेशने बुट्टेनाथ रोडवरील वनविभागाच्या व्ह्यू पॉईंटवरून आईच्या डोळ्या देखत खोल दरीत उडी मारली. आईचा आरडाओरडा ऐकून पत्रकारांनी पुन्हा तिकडे धाव घेतली.



अशोक दळवे यांनी दरीत उतरून पाहिले असता दिनेश मृतावस्थेत दिसून आला त्यांनी तात्काळ आंबेजोगाई पोलिसात फोन करून कळवले व घटनास्थळी पोलीस पावतात घटनेचा पंचनामा सुरू आहे.



सदरील आत्महत्या का व कशामुळे केली कारण स्पष्ट झाले नाही.

*हेही वाचा...सामाजिक कार्यकर्ते पद्मराज गुट्टे यांना पितृशोक अंत्यविधीची राख सावडणाच्या कार्यक्रमात दिला संदेश..*

👇👇👇

https://aplaepaper.blogspot.com/2022/10/blog-post_81.html

हेडलाईन्स न्यूज वाचण्यासाठी
👇👇👇
*https://aplaepaper.blogspot.com/

*संतोष बारटक्के*
*9423472426*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या