Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

"धनुभाऊ" इज ग्रेट' | विरोधकाची गळाभेट घेऊन दिल्या शुभेच्छा यासाठी मनाचा मोठेपणा लागतो...

 







"धनुभाऊ" इज ग्रेट' | विरोधकाची गळाभेट घेऊन दिल्या शुभेच्छा यासाठी मनाचा मोठेपणा लागतो...

धनंजय मुंडे यांनी परळीकरांमध्ये मिसळून साजरा केला दसरा मेळावा....

परळी येथे माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांनी परंपरेनुसार आपला दसरा परळीकरांच्या सोबत काळरात्री मंदिर येथे साजरा केला.  मुंडे यांनी सायंकाळी काळरात्री देवीचे दर्शन घेऊन आपल्या सहकाऱ्यांसोबत मंदिर परिसरात येणाऱ्या परळी शहरातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या. 


धनंजय मुंडे यांनी भाजपसह विविध पक्षाच्या पेंडॉल मध्ये जाऊन दिल्या शुभेच्छा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंदिराच्या बाहेर एक पेंडॉल उभारण्यात आला होता.त्या ठिकाणी जाऊन त्यांनी शुभेच्छा दिल्या तेव्हा नागरिकांनी ह्या प्रतिक्रिया देत स्वागत केले..

"धनुभाऊ" इज ग्रेट' | विरोधकाची गळाभेट घेऊन दिल्या शुभेच्छा यासाठी मनाचा मोठेपणा लागतो...


परळी वासीयांनी या ठिकाणी धनंजय मुंडे यांना शुभेच्छा देण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी एकमेकांना आपट्याची पाने देऊन शुभेच्छांची देवाणघेवाण रात्री उशिरापर्यंत सुरू होती.धनंजय मुंडे यांच्या सह उपस्थित सर्वांनी यावेळी देवीच्या पालखीचेही दर्शन घेतले.


समोरच भारतीय जनता पक्षाच्या वतीनेही शुभेच्छा देण्यासाठी पेंडॉल उभारला होता मात्र तिकडे तुरळक लोक सोडता फार गर्दी दिसली नाही. शेवटी धनंजय मुंडे हेच मनाचा मोठेपणा दाखवत थेट भाजपच्या पेंडॉल मध्ये गेले व तिथे उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांना आपट्याची पाने देऊन गळाभेट देऊन शुभेच्छा देऊन आले. त्याचबरोबर त्यांनी वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसच्या पेंडॉल मध्ये जाऊनही संबंधित पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. 


धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त केले अभिवादन




अशोक विजयादशमी तथा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त धनंजय मुंडे यांनी काळरात्री मंदिराजवळच असलेल्या बौद्ध विहार येथे जाऊन भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादान केले. 


याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अजय मुंडे, वाल्मिक अण्णा कराड, अभय मुंडे, रामेश्वर मुंडे, रा.कॉ. चे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, ऍड. गोविंदराव फड, बाळासाहेब देशमुख, प्रा. डॉ. मधुकरराव आघाव, दिपकनाना देशमुख, माणिकभाऊ फड, प्रा. विनोद जगतकर, दत्ता भाऊ सावंत, सय्यद सिराज, राधाकृष्ण साबळे, वैजनाथ सोळंके, अनिल अष्टेकर, महादेव रोडे, जयराज देशमुख, नितीन रोडे, जालिंदर नाईकवाडे, रवी मुळे, धम्मा अवचारे, यांसह पदाधिकारी व असंख्य परळीकर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या