Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

पंकजाताई मुंडेच राजकीय गणित नेमकं कुठं चुकतंय.. तर ते इथे..


पंकजाताई मुंडेच राजकीय गणित  नेमकं कुठं चुकतंय.. तर ते इथे..

पंकजाताई मुंडे यांनी आता सर्व पदांच्या स्पर्धेतून माघार घेत आपण 2024 च्या परळी विधानसभेची तयारी करीत असल्याची घोषणा दसरा मेळाव्यात केली.परळीतील कार्यकर्त्यांसाठी ही घोषणा म्हणजे उर्जा देणारी ठरणार आहे. ताई कितीही मोठ्या असल्या, त्यांना इतर मतदारसंघात कितीही मागणी असली, दुसर्‍या राज्यात भाजपाच्या प्रचारात त्या महत्वाच्या भुमिकेत असल्या, आणि त्या ‘न्यूज व्हॅल्यु’च्या नेत्या असल्या तरी त्यांचा परळीत पाय ठरत नव्हता ही वस्तुस्थिती आहे.


 मंत्री होत्या तेव्हाही आणि आता मंत्री नाहीत तरीही. ताईंनी आता 2024 ची तयारी सुरूच केली आहे तर त्यांनी परळीत थांबावं. एक ताई परळी बाहेर पडणार असेल तर दुसर्‍या ताईंनी परळीसोबत रहावं. 


बाहेरची उड्डाणं वरीष्ठ पातळीच्या राजकारणासाठी ‘आवश्यक’ असली तरी परळीतील त्यांंचा मुक्काम ‘अत्यावश्यक’ यादीतच असायला हवाय. कारण परळी आहे तर सगळं आहे.

2019 मध्ये आपल्याच लोकांनी आपला पराभव घडवून आणला असा आरोप ताईंचे कट्टर कार्यकर्ते करत असतात. खासकरून सगळ्यांचा रोख देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता. पण हेच फडणवीस मुख्यमंत्री असताना प्रत्येक लाल तारखेला नागपूर मुक्कामी असायचे. परळीतील ताईंचे राजकीय विरोधक असलेले धनंजय मुंडे यांनी देखील आतागायत परळीतील लाल तारखेचा मुक्काम टाळला नाही. 

अजित पवार तरी बारामतीत दुसरं काय करतात? पहाटे पाचपासून ते रात्री दोन पर्यंत ते सतत लोकांना भेटतच. त्यामुळे फडणवीस काय, पवार काय अन् आता धनंजय मुंडे काय यांचं राजकीस गणित चुकलेलं नाही. 

ताईंमध्ये वक्तृत्व आहे, कर्तृत्व आहे, स्व.मुंडेंचा वारसा आहे, संस्था, बँका, कारखानदारी आहे, सोबतीला निस्सीमपणे प्रेम करणारे अठरापगड जातीचे ऊसतोड मजूर आहेत, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांशी त्यांचा थेट संवाद आहे. त्या नरेंद्र मोदी, अमित शहांना भेटू शकतात, इतर राज्यांचे मुख्यमंत्री ताईंच्या स्वागताला असतात, राष्ट्रपती असो की राज्यपाल पंकजाताईंना थेट ओळखतात. या देशात कोणी असा राजकीय व्यक्ती नाही की पंकजाताई त्यांना ओळखत नाहीत किंवा ते पंकजाताईंना ओळखत नाहीत. मग सगळं असताना गणित नेमकं कुठं चुकतंय.. तर ते इथे! म्हणजे परळीत!! हे वाचायला कटू असेल पण आहे ते सत्आहेच!!!


बालाजी मारगुडे । बीड
9404350898


भाग दोन सविस्तर वाचा उद्या...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या