Ad Code

Ticker

10/recent/ticker-posts

परळीत | दम्यांच्या रूग्णांसाठी मोफत आयुर्वेद औषधी- चंदुलाल बियाणी

 


परळीत दम्यांच्या रूग्णांसाठी मोफतआयुर्वेद औषधी- चंदुलाल बियाणी

1940 पासून चालू असलेल्या प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वैद्य चंदुलाल कलंत्री यांचे औषधी 



परळी येथे कोजागिरी पोर्णिमेच्या निमित्ताने दम्याच्या आजाराने त्रस्त झालेल्या रूग्णांसाठी प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वैद्य चंदुलाल कलंत्री रा.तेलगाव जि.बीड यांचे औषध परळी शहर व परिसरातील नागरीकांसाठी मोफत उपलब्ध करून देत असल्याची माहिती राधा मोहन साथी प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी दिली.यासाठी दि.8 ऑक्टोबर पर्यंत नाव नोंदणी आवश्यक आहे. 


1940 पासून चालू असलेल्या परंपरेनुसार तेलगाव येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वैद्य चंदुलालजी कलंत्री यांच्या वतीने कोजागिरी पोर्णिमेनिमित्त दम्याच्या रूग्णांसाठी राधा मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने मोफत आयुर्वेद औषधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. 


दि9 ऑक्टोबर रोजी दै.मराठवाडा साथी कार्यालय गुरूकृपानगर परळी येथे सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दिले जाणार असून दि. 9 ऑक्टोबर रोजी बन्सल क्लासेस, माधवबाग येथे जे उपस्थित राहतील त्यांना रात्री 12 नंतर दुधासोबत मोफत औषधी दिली जाणार आहेत. 


गरजू रूग्णांनी याचा लाभ घ्यावा तसेच नाव नोंदणी करावी असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात येत आहे. नाव नोंदणीसाठी मराठवाडा साथीचे संपादक सतिश बियाणी 9422542753, राधेशाम झंवर 7420881008, राजेश मोदाणी 9970030144, प्रकाश वर्मा 9096653579 येथे संपर्क साधावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या